Gadchiroli : ११५ रुग्णांनी केला दारूमुक्त होण्याचा निर्धार

धानोरा तालुक्यातील कोंदावाही येथे आयोजित शिबिरात १८ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला.
gadchiroli
gadchirolisakal

गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागात वसलेल्या विविध गावांतील व्यसनी रुग्णांना वेळेवर व्यसन उपचार मिळावे यासाठी गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तिपथतर्फे गाव पातळीवर व्यसन उपचार शिबिराचे आयोजन केले जाते. नुकतेच जिल्ह्यातील विविध गावांत पार पडलेल्या शिबिराला उत्तम प्रतिसाद देत एकूण ११५ रुग्णांनी उपचार घेऊन दारूमुक्त होण्याचा निर्धार केला.

धानोरा तालुक्यातील कोंदावाही येथे आयोजित शिबिरात १८ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. रुग्णांची केस हिस्ट्री प्रभाकर केळझर, तर समुपदेशन व मार्गदर्शन छ्त्रपती घवघवे यांनी केले. शिबीराचे नियोजन भास्कर कड्यामी यांनी केले. सोबत स्पार्क कार्यकर्ता जीवन दहिकर होते. शिबिरसाठी ग्रामसभा अध्यक्ष देवाजी पदा,गाव पाटील देवराव पदा, अरविंद वडदा, कविता वडदा यांनी सहकार्य केले. कोरची तालुक्यातील दवंडी येथे गाव पातळी उपचार शिबिर आयोजन करण्यात आले.

gadchiroli
Gadchiroli News : मेडीगड्डा धरणाच्या पुलाचा पाया खचला; सिरोंचा तालुक्याला धोक्याचा इशारा

यात १२ जणांनी उपचार घेतला. सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका चेक येथील शिबिरातून १५ रुग्णांनी उपचार घेतला. चामोर्शी तालुक्यातील एकोडी येथे १८ रुग्णांनी पूर्णवेळ उपचार घेतला आहे. शिबिराचे नियोजन आनंद सिडाम यांनी केले. कुरखेडा तालुक्यातील खेडेगाव (गेवर्धा) येथे एकदिवसीय व्यसन उपचार शिबिरात एकूण १९ रुग्णांनी उपचार घेतला. एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम सार्वजनिक गोटुल टिटोळा या गावात १८ रुग्णांनी उपचार घेतला.

gadchiroli
Gadchiroli News : कट्टर हिंदुत्त्ववादाविरुद्ध लढण्याचे नक्षलवाद्यांचे फलकाद्वारे आवाहन

रुग्णांची नोंदणी स्पार्क कार्यकर्ता उत्कर्ष राऊत यांनी केली. केस हिस्टरी संयोजक दशरथ रमकाम यांनी, तर रुग्णाचे समुपदेशन व ग्रूप सेशन समुपदेशक पूजा येलूरकर यांनी घेतले. गाव पातळी क्लिनिकचे नियोजन व व्यवस्थापन तालुका संघटक किशोर मलेवार यांनी केले. क्लिनिकसाठी मुक्तिपथ गाव संघटन सदस्य तिंगरा वेळदा, आशा वर्कर छाया जेट्टी, अशोक दोरपेती, दिलीप मडावी, मुख्याध्यापक एल. बी. गुंडरू, बी. एम. वेळदा आदींनी सहकार्य केले. गडचिरोली तालुक्यातील हिरापूर येथील शिबिराच्या माध्यमातून १५ रुग्णांनी उपचार घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com