Maoist Banners Found Near Kundam Village in Gadchiroli
esakal
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात पिपली बुर्गी उप पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुंडम गावाजवळ रविवार (ता. १२) माओवादी आशयाचे बॅनर आणि पत्रके आढळून आल्याने परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.