
गडचिरोलीत धान्य खरेदी घोटाळा प्रकरणी खरेदी केंद्राच्या पाच संचालकांना अटक करण्यात आलीय. हा घोटाळा जवळपास दीड कोटी रुपयांचा असून १० हजार क्विंटल धान्याच्या खरेदीत तफावत असल्याचं आढळून आलंय. या प्रकरणी देऊळगाव खरेदी केंद्राच्या अध्यक्ष, सचिव यांच्यासह १७ जणांवर गुन्हा दाखल केला होता. यापैकी दोघांना याआधी अटक झाली होती. आता आणखी पाच जणांना अटक करण्यात आलीय.