गडचिरोली : एसटी कर्मचाऱ्यांनी केले मुंडण आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडचिरोली : एसटी कर्मचाऱ्यांनी केले मुंडण आंदोलन

गडचिरोली : एसटी कर्मचाऱ्यांनी केले मुंडण आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : गडचिरोली आगारातील संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शासनाचा निषेध करत शुक्रवार (ता. १२) मुंडण केले. जोपर्यंत राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करीत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका घेत कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री अनिल परब हे आंदोलनात फूट पाडत असल्याचा आरोपही केला.

जे कर्मचारी कामावर येतील त्यांना पूर्ण संरक्षण देण्यात येईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. परंतु शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडविण्यासंदर्भात ठोस आश्वासन देत नाही, तोपर्यंत गडचिरोली विभागातील कर्मचारी आंदोलन करीत संपात सहभागी होणार असल्याचेही यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत संप सुरू ठेवण्याची भूमिका एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी घेतल्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. परंतु शासनाकडून ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे कर्मचारी संघटना माघार घेण्याच्या तयारीत नाहीत. गडचिरोली विभागातील ४८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असली तरी कर्मचाऱ्यांनी मात्र याला न घाबरता आंदोलन अजून तीव्र करण्याची भूमिका घेतल्यामुळे हा संप चिघळणार असे दिसून येत आहे.

loading image
go to top