Gadchiroli : विद्यार्थी रमले विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या सहवासात

ग्रिन्स संस्थेच्या वतीने उपक्रम; वन्यजीव सप्ताहानिमित्त पक्षिनिरीक्षण शिबिर
gadchiroli
gadchiroli sakal

गडचिरोली - 'पक्षी हे निसर्गाला पडलेले सुंदर स्वप्न आहे' असे म्हटले जाते. त्यामुळे निसर्गसमृद्ध अशा गडचिरोली जिल्ह्यातील बालकांना विविध रंगी आणि विविध वैशिष्ट्यांनी नटलेल्या पक्ष्यांविषयी शास्त्रीय तसेच सखोल माहिती मिळावी, या उद्देशाने निसर्ग संरक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ग्रिन्स (ग्लोबल रिसर्च, इव्हार्यमेंट, एज्युकेशन, नेचर, सोशल वेलफेअर असोसिएशन) च्या वतीने वन्यजीव सप्ताहानिमित्त बुधवार (ता. ४) पक्षिनिरीक्षण शिबिर आयोजित करण्यात आले.

ग्रिन्स संस्थेच्या वतीने वन्यजीव सप्ताहानिमित्त निसर्ग प्रबोधनपर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून स्थानिक भगवंतराव हिंदी हायस्कूल तथा कनिष्ठ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी हे विशेष पक्षिनिरीक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराला ग्रिन्स संस्थेच्या अध्यक्ष अंजली कुळमेथे, गडचिरोली जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, शिक्षक किशोर पाचभाई यांची प्रमुख उपस्थिती होती. स्थानिक लांझेडा ते खरपुंडी मार्गाच्या परीसरातील पक्ष्यांचे तसेच वनस्पती,कीटक व निसर्गातील विविध घटकांचे निरीक्षण करण्यात आले.

gadchiroli
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे यांनी परीसरातील पक्ष्यांची इंग्रजी, मराठी नावे सांगत त्या पक्ष्यांची वैशिष्ट्ये, त्यांचे विविध प्रकारचे आवाज, घरट्यांचे प्रकार, त्यांचे खाद्य, निसर्गातील पक्ष्यांची महत्त्वाची भूमिका अशा अनेक बाबींची सविस्तर माहिती दिली. ग्रिन्सच्या अध्यक्ष अंजली कुळमेथे म्हणाल्या की, या विविध रंगांच्या, आवाजांच्या पक्ष्यांचे अस्तीत्व नष्ट झाले तर या जगाचा आणि पर्यायाने आपलाही विनाश अटळ आहे.

gadchiroli
Sangli Police : सांगलीत कॉलर धरून, जातिवाचक शिव्या देत पोलिसाला मारहाण; विश्रामबाग पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल

अनेक पक्षी कीटकभक्षक आहेत. तसेच घुबड, कापशीसारखे पक्षी उपद्रवी उंदरांचा बंदोबस्त करून आपल्याला नेहमीच मदत करतात. त्यामुळे आपण सर्वांनी या निसर्गाचे रक्षण करण्यासाठी व सृष्टी अधिक सुखी, सुंदर, समृद्ध करण्यासाठी पक्ष्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. शिक्षक किशोर पाचभाई म्हणाले की, पक्षी वृक्षांची फळे खातात. त्यांच्या पोटातून प्रक्रिया झालेली बिजे जमिनीवर पडताच उगवून येतात,

gadchiroli
Solapur News : चिंचोली एमआयडीसी हाउसफुल्‍ल; १५१ हेक्टरचे भूसंपादन

अनेक पक्षी बिजवहनाचे आणि परागीभवनाचे काम करतात. पक्ष्यांचे निसर्गातील महत्त्व लक्षात घेता. त्यांचे जतन अत्यावश्यक असल्याचेही ते म्हणाले. या शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या निसर्गविषयक प्रश्नांची सविस्तर उत्तरे देत त्यांचे शंकासमाधान करण्यात आले. या शिबिरासाठी अबुझमाड शिक्षण मंडळाचे सचिव शमशेरखान पठाण, भगवंतराव हिंदी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य लीना हकीम तसेच ग्रिन्स संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com