जि. प.च्या आवारात चालायचा जुगार; पोलिसांचा छापा अन् आठ जण ताब्यात

या छाप्यात ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे
Gambling
Gambling

यवतमाळ : येथील जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात जुगार (Gambling) खेळत असल्याची गुप्त माहिती अवधूतवाडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात (Police raid) जिल्हा परिषदेच्या काही कर्मचाऱ्यांसह आठ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी मध्यरात्री करण्यात आली.

प्रकाश कुद्रुपवार (५३, रा. प्रभातनगर, यवतमाळ), देवानंद जामनकर (४८, रा. शास्त्रीनगर), गणेश गोसावी (५५, रा. शिवम कॉलनी), प्रकाश व्यास (५८, रा. जिल्हा परिषद क्वार्टर), गुणवंत ढाकणे (४७, रा. जामनकरनगर), अनिल शिरभाते (४५, रा. जामनकरनगर), संदीप श्रीरामे (४५, रा. वैभवनगर), चरण राठोड (५३, रा. विदर्भ हाउसिंग सोसायटी, यवतमाळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Gambling
‘पाच वर्षांत वाचलो; पुन्हा योगी आले तर आम्ही वाचणार नाही’

त्यांच्याकडून ३१ हजार ११० रुपये रोख, नऊ मोबाईल, पाच दुचाकी व दोन चारचाकी असा एकूण पाच लाख चार हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान एरावत चव्हाण (५५) हा घटनास्थळावरून फरार झाला. घटनास्थळावर त्याचा मोबाईल मिळाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

जिल्हा परिषदेच्या कार्यालयात जिल्हा परिषद कार्यालयातील निवृत्त वाहनचालक टाईमपास म्हणून पत्ते खेळत (Gambling) बसायचे. मग तेथे त्यांना काही नवीन सोबती मिळालेत. कार्यालय संपल्यानंतर काही कर्मचारीदेखील जुगार खेळू लागलेत. रात्री उशिरापर्यंत तेथे जुगार चालत होता. त्यात काही मद्यप्रेमीही असल्याने त्यांच्या मद्यप्राशनाचा कार्यक्रमदेखील तेथेच चालत होता.

Gambling
मटण खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाणे टाळा; अन्यथा या परिणामांना तयार राहा

अनेक महिन्यांपासून हा प्रकार बिनबोभाटपणे सुरूच होता. त्यामुळे तेथे नियमित बसणारेही बिनधास्त होते. मात्र, शुक्रवारी अवधूतवाडी पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाली आणि त्यांनी या गुजारावर (Gambling) छापा (Police raid) टाकला. या छाप्यात ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेचे कर्मचारी जुगार खेळण्याच्या घटनेत सहभागी असल्याचे दिसून येते. म्हणून त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची व शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासोबत या विषयावर चर्चा केली. जिल्हा परिषद परिसरात बसविलेले सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यासंदर्भात आदेश दिले आहे.
- कालिंदा पवार, अध्यक्ष, जिल्हा परिषद, यवतमाळ
जिल्हा परिषदेच्या प्रांगणात काही कर्मचारी जुगार खेळत आहेत, अशी माहिती मिळाली. माहितीवरून छापा (Police raid) टाकला असता तेथे काही लोक जुगार खेळताना आढळले. त्यांच्यापैकी आठ जणांना ताब्यात घेतले असून, एक जण फरार आहे. पुढील कारवाई सुरू आहे.
- मनोज केदार, पोलिस निरीक्षक, अवधुतवाडी पोलिस ठाणे, यवतमाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com