गॅंगस्टर बाल्या नाम हैं मेरा...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 डिसेंबर 2019

नव्याने उदयास आलेला गॅंगस्टर बाल्या मानेने शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी त्याने मोठी गॅंग तयार केली आहे. एका ट्रॅव्हल्सच्या मालकाला "बाल्या माने को पहचानता क्‍या' असे विचारले. त्याने बाल्याला ओळखत नसल्याचे सांगितल्यानंतर "गेम' करण्याची धमकी देत खंडणी वसूल केली. 

नागपूर : गुन्हेगारी जगतात संतोष आंबेकर, बद्रे, चिंतलवार, गिजऱ्या, शेखू आणि सुमित या गॅंगनंतर नव्याने उदयास आलेला गॅंगस्टर बाल्या मानेवर गणेशपेठ पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने एका ट्रॅव्हल्सच्या मालकाला "बाल्या माने को पहचानता क्‍या' असे विचारले. त्याने बाल्याला ओळखत नसल्याचे सांगितल्यानंतर "गेम' करण्याची धमकी देत खंडणी वसूल केली. बाल्या मानेला रविवारी (ता. 22) पोलिसांनी अटक केली. 

मॉडेल मील चाळ येथे राहणारे नितीन नत्थू नगराळे (42) यांचे जाधव चौकात श्री साई टुर्स ऍण्ड टॅव्हल्स नावाचे कार्यालय आहे. दहा डिसेंबरला दुपारी दोनच्या सुमारास ते आपल्या कार्यालयात बसून होते. त्यावेळी गुंड संदीप ऊर्फ बाल्या माने (रा. शनिवारी, गुजरवाडी) आपल्या नऊ साथीदारांसह नगराळे यांच्या कार्यालयात आला आणि खुर्चीवर बसला. "बाल्या माने को पहचानता क्‍या' अशा शब्दांत बाल्याने नगराळे यांना धमकावले. त्यावर नगराळे यांनी मी बाल्या मानेला ओळखत नाही, असे म्हटल्यानंतर बाल्याचे साथीदार नगराळे यांना मारहाण करू लागले. 

काय आहे या लिंकमध्ये? - किती ही मस्ती? गंमत म्हणून केले असे अन्‌... 

तेथील लोकांनी बाल्या व त्याच्या साथीदारांना तेथून बाहेर काढले. मात्र, बाल्या व त्याच्या साथीदारांनी नगराळे यांना शिवीगाळ करून पाच हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केली. हप्ता न दिल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. घाबरलेल्या अवस्थेत नगराळे यांनी बाल्याला पाच हजार रुपये दिले. या प्रकरणी नितीन नगराळे यांच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी बाल्या व त्याच्या साथीदारांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. 

सविस्तर वाचा - पत्नीने केला दुसरा घरोबा.... रागाच्या भरात पतीने उचलले हे पाऊल

बाल्याच्या साथीदारांना अटक

गॅंगस्टर बाल्या मानेची दहशत संपूर्ण शहरात आहे. कुख्यात डॉन संतोष आंबेकरच्या पावलावर पाऊल टाकत त्याने व्यावसायिकांना खंडणी मागण्याचा धंदा जोरात सुरू केला आहे. त्यासाठी त्याने मोठी गॅंग तयार केली आहे. बाल्या माने पोलिसांना गुंगारा देत असल्यामुळे त्याचे पंटर प्रतीक वामन लांबट (वय 28) आणि विलास गजानन बांबलवार (वय 26, रा. गुजरवाडी, गणेशपेठ) या दोघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांना हिसका दाखवताच बाल्या मानेबाबत माहिती दिली. 

उघडून तर बघा - निराधार व अंध असूनही मिळविले हे यश... वाचा ही प्रेरणादायी कहाणी

बाल्याचा घेणार पीसीआर

गॅंगस्टर बाल्या मानेला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्याचा पीसीआर देण्यात यावा, अशी मागणी पोलिसांनी केली. मात्र, पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार त्याने न्यायालयात केली. त्यामुळे न्यायालयाने त्याला पीसीआर न देता न्यायालयीन कोठडीसाठी मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. परंतु, पोलिस सोमवारी त्याचा पुन्हा पीसीआर घेणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gangster balya arrested in Nagpur