प्रेमाला प्रतिसाद न दिल्याने त्याने तिच्याशी रस्त्यातच केले असभ्य वर्तन 

Marhan
Marhan

अमरावती : तिने आपला कॉल उचलावा, दोन शब्द प्रेमाने बोलावे, अशी त्याची मनोमन इच्छा होती. परंतु तिने कॉलला प्रतिसाद न देता प्रतीक्षेत असलेल्या युवकास ताटकळत ठेवले. त्यामुळे त्याने तिला रस्त्यात गाठून जाब विचारला. तिने नकार देताच त्याने रस्त्यावरच तिच्या श्रीमुखात लगावल्या. जिल्ह्यातील शिरसगावकसबा ठाण्याच्या हद्दीत एका गावात ही घटना घडली. 

आसीम नामक युवक त्याच्या नातेवाइकाच्या घरासमोर उभा होता. तेवढ्यात युवती (वय 19) त्याच घरासमोरून जात असल्याचे बघून आसीमने तिला अडविले. त्याच्या मोबाईल कॉलला प्रतिसाद न देण्याबाबत त्याने तिच्याकडे विचारणा करून तिला शिवीगाळसुद्धा केली. तिने पुन्हा कॉल न करण्याबाबत आसीम याला बजावले असता तिने सुनावलेले बोल त्याच्या जिव्हारी लागले. त्याने युवतीशी रस्त्यावरच असभ्य वर्तन केले व मारहाण केली. त्यामुळे शेजाऱ्यांनी दोघांमधील वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी केली. परंतु आसीमने मध्यस्थी करणाऱ्यांवरही हात उगारून पळ काढला. 

काही दिवसांपासून आसीम आपल्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप पीडितेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला. प्रकरणी शिरसगाव कसबा पोलिसांनी आसीम नामक युवकाविरुद्ध विनयभंग, मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  

संपादन ः राजेंद्र मारोटकर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com