मानलेल्या मामा-मामीने केला दगाफटका; पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा होता खरा

crime
crime

अचलपूर (अमरावती) : सावळी मंदिर परिसरात 25 सप्टेंबरच्या रात्री पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेची उकल करीत सक्षम पुरावे नसतानाही परतवाडा पोलिसांनी सत्य बाहेर आणले आहे. याप्रकरणात युतीच्या तक्रारीवरून आतापर्यंत दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी सात संशयित आरोपींना ताब्यात घेतले, तर मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे. सदर विनयभंगाची घटना मानलेल्या मामा-मामीच्या दगाफटक्‍यामुळे झाल्याचे मुलीच्या बयाणावरून दिसून येत आहे.

परतवाडा ते अंजनगाव मार्गावरील मंदिर परिसरातील सभागृहात शुक्रवारच्या रात्री एका युवतीवर अत्याचारासह जादूटोणा झाल्याचा प्रकार घडल्याची चर्चा होती. पोलिसांनीसुद्धा घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठले होते. कुठलीच तक्रार व सक्षम पुरावे नसताना पोलिसांसमोर सत्य बाहेर आणण्याचे आव्हान उभे थाटले होते. पण काही तासांतच परतवाडा पोलिसांनी चक्रे फिरवित खरा प्रकार उघडकीस आणला आहे.

यामध्ये आतापर्यंत युवतीच्या तक्रारीवरून मानलेले मामा-मामी संतोष सोनोने व त्याची पत्नी, प्रतीक उदापूरकर, शुभम मोडक, रफिक खान, कासम खान, संतोष कलाने, संजय गायकवाड, स्वामी शिवनारायण पुरी, मो.नईम, बबलू थोरात यांच्या विरोधात पास्कोसह ऍक्‍ट्रासिटी ऍक्‍टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यापैकी मो. नईम, संजय गायकवाड, बबलू थोरात फरार असल्याची माहिती परतवाडा पोलिसांनी दिली. या गुन्ह्याची उकल पोलिस अधीक्षक डॉ. हरीबालाजी एन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.अब्दागिरे, ठाणेदार सदानंद मानकर यांनी केली आहे.

अचलपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी पोपट अब्दागिरे म्हणाले, या घटनेची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आली असून मुलीच्या तक्रारीवरून आतापर्यंत दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सात जणांना अटक करण्यात आली. यामधील सूत्रधार फरार झाला आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com