Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

Maharashtra to Receive Rain Over the Next Three Days : परतीच्या पावसामुळे पुढील तीन दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Vidarbha Orange Alert

Vidarbha Orange Alert

esakal

Updated on

पुणे : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर परतीच्या पावसाने मंगळवारी (ता. २२) सायंकाळी पुणे शहरात जोरदार हजेरी लावली. दरम्यान, पुढील तीन दिवस पुण्यासह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. परिणामी पुण्याच्या घाट विभागासह राज्याच्या अनेक भागांत पावसाचा ‘यलो’ अलर्ट, तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे.

हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, बुधवारी (ता. २३) शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहील. दुपारनंतर किंवा सायंकाळी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे परिसरातील घाटमाथ्यावर सोसाट्याचे वारे वाहण्याचा आणि पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज असल्याने या भागासाठी ‘यलो’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. गोव्यासह संपूर्ण राज्यात पुढील तीन दिवस अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Vidarbha Orange Alert
Petrol Diesel Price Today: रशिया-अमेरिकेत डिझेल महागले! भारतात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; पाहा ताजे रेट

काही भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज आहे. राज्याच्या उत्तर भागाचा अपवाद वगळता अनेक भागांत तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या भागांसाठी ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात पावसाचा जोर सर्वाधिक विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

२४ सप्टेंबरला यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली, तर २५ सप्टेंबरला चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. या काळात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता असल्याने संबंधित जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे.

Vidarbha Orange Alert
Maharashtra Drought Survey : दुष्काळी पंचनामे आजपासून; चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती

मॉन्सूनच्या परतीस पोषक स्थिती नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरी सीमा जैसलमेर, नागौर, रोहतक, पटियाला आणि गुरुदासपूरपर्यंत कायम आहे. पुढील दोन दिवसांत पंजाब, दिल्ली, चंडीगड, हरियाणाचा उर्वरित भाग, राजस्थानचा आणखी काही भाग, सौराष्ट्र-कच्छ, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्‍चिम उत्तर प्रदेशातील काही भागांतून मॉन्सून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. दरम्यान, पश्‍चिम मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पश्‍चिमेकडे सरकत आहे. हे क्षेत्र २३ सप्टेंबरच्या मध्यरात्री विशाखापट्टणम ते गोपालपूरदरम्यानच्या किनारपट्टीवर ‘डीप डिप्रेशन’च्या स्वरूपात धडकण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com