जनावरांची वाहतूक करणारी सात वाहने पकडली; १५ जणांवर गुन्हा दाखल

Gondia police caught vehical with pet animals
Gondia police caught vehical with pet animals

गोंदिया : जनावरांची अवैधरीत्या वाहतूक करणारे सात बोलरो पिकअप वाहन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केले आहेत. या प्रकरणी १५ जणांवर गुन्हे दाखल केले असून, ३७ जनावरांची सुटका केली आहे. ही कारवाई बुधवारी (ता. २५) धापेवाडा नाल्याच्या वळणावर नाकाबंदी करून करण्यात आली.

दवनीवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर होते. यावेळी त्यांना बोलेरो पिकअप वाहनांत जनावरे भरून चंगेराकडून नागपूरच्या कत्तलखान्यात नेली जात आहेत, अशी गुप्त माहिती मिळाली. या माहितीवरून पथकाने धापेवाडा नाल्याच्या वळणावर नाकाबंदी केली. दरम्यान, पथकाला एकामागून एक अशी सात बोलेरो पिकअप वाहने येताना दिसली. या सर्व वाहनांना थांबवून त्यांची चौकशी केली असता जनावरे कोंबलेल्या अवस्थेत आढळली.

एमएच २८/ बी. बी. ०२९६, एमएच ३६/ एफ. ३०६२, एमएच २०/सी.टी. ६१८५, एमएच ३५/ए. जे. १५२४, एमएच ३५/के.४३०२, एमएच ३५/के. ३३९२, एमएच ३५/ए. जे. ०९४३ या क्रमांकाच्या वाहनांत एकूण ३७ जनावरे कोंबलेल्या अवस्थेत दिसून आली.
पथकाने वाहनचालकांकडे विचारपूस केली त्यांच्याकडे जनावरे वाहतुकीचा परवाना नव्हता. 

तथापि, रविशंकर हिरालाल बिजेवार ( वय २९, रा. काटी), अजहर कमाल बेग ( वय २३, रा. चंगेरा), किसन राजाराम कावरे (वय २४, रा. काटी), अनिल हौसलाल उके (वय २७, रा. चंगेरा), मजहर कमाल बेग (वय २७, रा. चंगेरा), मुस्तक राज खान ( वय ४९, रा. चंगेरा), सचिन अमरसिंग सावंत (वय २७, रा. कोचेवाही), दिलीप जितेंद्र रंगारी (वय ३०, रा. चंगेरा), खेमराज मेकचंद टेकाम ( वय २७, रा. चंगेरा), अशोक गेंदलाल बागडे (वय ३०, रा. चंगेरा), सोहेब मुकीम बेग (वय २१, रा. चंगेरा), शिवराम उदेलाल हिरवानी (वय ४६, रा. चंगेरा), एबाज निसार खान (वय २४, रा. चंगेरा), तौफिक तालिब खान (वय २०, रा. चंगेरा), जयलाल उदेलाल हिरवानी यांच्याविरुद्ध दवनीवाडा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

या कारवाईत ३७ जनावरे, १२ मोबाईल, ७ वाहने असा एकूण ४९ लाख २८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यांनी केली ही कारवाई

पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, पोलिस कर्मचारी लीलेंद्र बैस, कवलजितपालसिंग भाटिया, अर्जुन कावळे, मधुकर कृपाण, राजू मिश्रा, रेखलाल गौतम, महेश मेहर, चित्तरंजन कोडापे, नेवालाल भेलावे, इंद्रजित बिसेन, अजय रहांगडाले, मुरली पांडे यांनी ही कारवाई केली. 

संपादन -अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com