grampanchayat election candidate kidnapped in hingana of nagpur
grampanchayat election candidate kidnapped in hingana of nagpur

ग्रामपंचायतीतच रंगला फिल्मी ड्रामा; दारू पाजून केलं अपहरण अन् घडवून आणली बिनविरोध निवडणूक

हिंगणा (जि. नागपूर) : येत्या 15 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 30 डिसेंबरपर्यंत 12 हजार 644 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे अनेक ठिकाणी ग्रामपंचायतींमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्‍यता पाहता पॅनेल प्रमुखांनी पुढाकार घेत अनेकांची माघार घडवून आणली. मात्र, अर्ज मागे घेत नाहीये म्हणून उमेदवारासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. 

घरून पळवून नेले व ग्रामपंचायत निवडणुकात सदस्यपदासाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अशी तक्रार पेठ ग्रामपंचायत येथून निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसात दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रामभाऊ सर्वेलाल पवार (रा. रिठी, पेठ, ता.नागपूर), असे तक्रारकर्त्याचे नाव असून त्याने पेठ गटग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत नागपूर ग्रामीण तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज केला होता. सोमवारी (ता.४) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. 

तक्रारकर्त्याच्या माहितीवरून सोमवारी सकाळी १० वाजता एका आरोपीने त्याला निवडणूक चिन्ह घेण्यासाठी घरून नेले. त्यानंतर धामना या गावात आणखी आरोपींच्या तीन साथीदारांनी त्याला दारू पाजली. तिथून थेट नागपूर ग्रामीण तहसील कार्यालयात नेऊन उमेदवारी अर्ज मागे घायला लावला. त्यानंतर त्याला दूर नेऊन सोडून दिले. सोमवारच्या रात्री १०.३० वाजता त्याने हिंगणा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी बाल्या बावणे, दीपक करवा, पुरुषोत्तम सोनवणे (सर्व रा‌.पेठ) व मनोहर येलेकर (रा.धामना) या चारही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पेठ ग्रामपंचायतमधील या वॉर्डात रामभाऊ पवार यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com