esakal | धक्कादायक! आजीने रचला चिमुकल्याच्या अपहरणाचा प्लॅन; दोन महिन्यांपासून सुरू होती हालचाल

बोलून बातमी शोधा

grandmother hatched a plan to harass child in Amravati crime news}

सपनाला पैसे नेहमीच मिळत होते. सतत आर्थिक पुरवठा सुरू असताना सपना हिला मोठ्या रकमेची लालसा झाली. तिने नयनची आजी मोनिका ऊर्फ प्रिया हिला विश्‍वासात घेतले. त्यांनी पैशासाठी एका सराईताच्या माध्यमातून नयनच्या अपहरणाचा प्लॅन रचला.

धक्कादायक! आजीने रचला चिमुकल्याच्या अपहरणाचा प्लॅन; दोन महिन्यांपासून सुरू होती हालचाल
sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती : शारदानगर येथील चार वर्षीय नयन मुकेश लुणीया या चिमुकल्याच्या अपहरणाचा नियोजनबद्ध पद्धतीने दोन महिन्यांपासून प्लॅन रचण्यात आला होता. नयनची आजीच या घटनेत सहभागी असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली आहे.

सपना ऊर्फ हिना शाकीर शेख ऊर्फ हिना अनिकेत देशपांडे, बंबईया ऊर्फ अल्मश ताहीर शेख, आसिफ युसूफ शेख, फिरोज रशीद शेख (सर्व रा. कोठला, अहमदनगर), मुसाहिब नासीर शेख (रा. मुकुंदनगर, अहमदनगर), मोनिका ऊर्फ प्रिया ऊर्फ मुन्नी जसवंतराय लुणीया (रा. शारदानगर, अमरावती) अशी कटात सहभागींची नावे आहेत. मुख्य सूत्रधार विक्रांत शेख ऊर्फ टकलू (रा. अहमदनगर) हा पसार आहे.

जाणून घ्या - कुटुंबीयांसोबतचे 'ते' जेवण ठरले अखेरचे, घराच्या दिशेने निघालेल्या 'बरखा'वर काळाचा घाला

अपहरणकर्त्यांच्या तावडीतून नयनची सुखरूप सुटका केल्यानंतर पोलिस शनिवारी अमरावतीत दाखल झाले. त्यानंतर पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी प्रसार माध्यमांना घटनाक्रमाची माहिती दिली. अधिक पैसे मिळविण्यासाठीच नयनच्या आजीने नगर येथील माहेरच्या मैत्रिणीच्या मदतीने नातवाच्या अपहरणाचा नियोजनबद्ध प्लॅन आखून अपहरण केले, असे सीपींनी स्पष्ट केले.

मोनिका ऊर्फ प्रिया लुणीया ही नयनची आजी आहे. सपना ऊर्फ हिना ही मोनिकाची जुनी मैत्रीण आहे. मोनिका विवाहापूर्वी अहमदनगर येथे राहत होती. लहानपणीच तिचे आई-वडील सोडून गेले. त्यानंतर ओळखीतील एका कुटुंबाने मोनिकाचे पालनपोषण केले. पालनपोषण करणाऱ्यांची परिस्थिती बेताचीच होती. मोनिकाचे लग्न श्रीमंत लुणीया कुटुंबातील जसवंतराय सोबत झाले. सपना ऊर्फ हिना ही अनेकदा अमरावतीत येऊन मोनिकाच्या घरी राहायची.

त्यामुळे नयनला ती ओळखायची. ती नगरमध्ये असताना पालनपोषण करणाऱ्यांना अमरावतीवरून पैसे पाठवीत होती. सहाजिकच सपनाला पैसे नेहमीच मिळत होते. सतत आर्थिक पुरवठा सुरू असताना सपना हिला मोठ्या रकमेची लालसा झाली. तिने नयनची आजी मोनिका ऊर्फ प्रिया हिला विश्‍वासात घेतले. त्यांनी पैशासाठी एका सराईताच्या माध्यमातून नयनच्या अपहरणाचा प्लॅन रचला. परंतु, लुणीया कुटुंबाकडून मोठी रक्कम हडपण्यापूर्वीच ही टोळी पोलिसांना सापडली.

अधिक माहितीसाठी - नागरिकांनो! सोन स्वस्त, आताच करा खरेदी; लवकरच होणार विक्रमी दर?

विक्रांत शेख प्लॅनचा मास्टरमाइंड

पैशासाठी सपना ऊर्फ हिना हिने मोनिकाच्या माध्यमातून योजना आखली. योजनेचा रचियता हा कुख्यात विक्रांत शेख ऊर्फ टाकलू (रा. अहमदनगर) हा आहे. हिनाने प्लॅन यशस्वी करण्यासाठी त्याची मदत घेतली. विक्रांत याच्यावर लहान मुलांचे अपहरण, खंडणी, घरफोडीचे १९ गुन्हे दाखल आहेत.

मुलगा सुखरूप सापडला यातच समाधान
आपलाही मुलगा चार वर्षांचा आहे. पोटचा गोळा दूर झाल्यानंतर काय दु:ख होते याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे चिमुकला नयन अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सापडला यातच खरे समाधान आहे.
- डॉ. आरती सिंह,
पोलिस आयुक्त, अमरावती