खुशखबर! अमरावतीतील गुरुकुंज सिंचन योजनेचा लाभ सर्वच गावांना

gurukunj irrigation project benefits to all villages in amravati says adv yashomati thakur
gurukunj irrigation project benefits to all villages in amravati says adv yashomati thakur

अमरावती : सात हजार 109 हेक्‍टर सिंचन क्षमता असलेल्या व सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्चाच्या गुरुकुंज उपसा सिंचन योजनेचा लाभ सर्वच गावातील शेतीला समप्रमाणात होणार आहे. याबाबत पालकमंत्री अ‌ॅड. यशोमती ठाकूर यांनी माहिती दिली.

मोर्शी येथे अप्पर वर्धा धरणाच्या तिवसा तालुक्‍यातून गेलेल्या उजव्या मुख्य कालव्यातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावे या हेतूने गुरुकुंज उपसा सिंचन योजना आकारास येत आहे. अडीचशे कोटी खर्चाच्या या योजनेतून गुरुदेवनगर, मोझरी, माळेगाव, शिवगाव, शिरजगाव मोझरी, शेंदोळा खुर्द, शेंदोला बुद्रूक, घोटा, भाबोरा, कोडवन, अनकवाडी, रघुनाथपुर, मालधूर, वऱ्हा, वाथोडा खुर्द, रंभापुर, फत्तेपूर आदी गावांना लाभ मिळणार आहे. या योजनेतून अंदाजे सात हजार 109 हेक्‍टर इतकी शेती सिंचनाखाली येणार आहे. सर्व गावांना समप्रमाणात पाणी मिळणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. याबाबत कुणीही संभ्रम बाळगू नये, असेही त्या म्हणाल्या.

सिंचन योजनेची मागणी पूर्णत्वास जाण्यासाठी पूर्वीपासून सतत प्रयत्न होत आहेत. ज्येष्ठ नेते व माजी आमदार भैयासाहेब ठाकूर यांनी 1984 मध्ये शेतकरी बांधवांना धरणाचे पाणी मिळण्यासाठी मागणी केली होती. त्यानुसार अप्पर वर्धा धरण प्रकल्प प्रशासनाने एक सर्वेक्षणसुद्धा केले होते. तथापि, ज्या गावातील शेतकऱ्यांनी ही मागणी केली होती, ती गावे उंच भागावर, तर कालवा सखल भागात असल्यामुळे कालव्यातून पाणी देण्याबाबत तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. मात्र, त्यांच्याकडून विकासाची दूरदृष्टी, शेतकरी हितासाठी कायम कटिबद्धता ठेवून शेतकऱ्यांच्या पाण्यावरील हक्कासाठी सातत्याने भूमिका मांडण्यात आली. ही भूमिका ठाम ठेवून आपणही सातत्याने विधिमंडळात पाठपुरावा केला आहे. त्यानुसार मोझरी गुरुकुंज उपसा सिंचन योजना आकारास आली.

या योजनेची चाचणीसुद्धा 31 जुलै 2020 रोजी घेण्यात आली आहे. पंप हाउस व इतर सर्व कामे पूर्ण झाली आहेत. ही योजना पूर्णत्वास जाण्यासाठी येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत विशेष बैठक लवकरच होणार आहे, अशी माहितीही पालकमंत्र्यांनी दिली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com