किलोभर केसांवर ग्रॅमभर सोने; केस सांभाळून ठेवण्याचा ट्रेंड

किलोभर केसांवर ग्रॅमभर सोने; केस सांभाळून ठेवण्याचा ट्रेंड

जामली (जि. अमरावती) : फुगे घ्या फुगे, हे लोकगीत डिजेवर सध्या धुमाकूळ घालत आहे. आता या केसांना सोन्याचे भाव मिळत आहे. किलोभर केसांच्या बदल्यात चक्क ग्रामभर सोनेसुद्धा विकत घेता येऊ शकते. आधी फुगे आणि भांडी घेता येत होती. मात्र, आता केसाला सोन्याचा भाव मिळत असल्याने गळलेले केस सांभाळून ठेवण्याचा प्रकार वाढला आहे.

५० ग्रॅम केसांना २०० रुपयांहून अधिक भाव मिळत आहे. त्यामुळे महिलांनी केस विचरताना गळलेल्या केसांचा पुंजका फेकणे बंद केले आहे. आता प्रत्येक पुंजका तत्परतेने जपून ठेवला जात आहे. पूर्वी गल्लोगल्ली केसांवर फुग्यांची खरेदी केली जायची, मग फुग्यांची जागा भांड्यांनी घेतली. आता मात्र केस वजनाने खरेदी केली जात आहे. दीड वर्षापूर्वी दोन हजार रुपये किलोने विकले जाणारे केस सध्या दुप्पट भावाने खरेदी केली जात आहे. केसांना कमी अधिक चार हजार रुपये भाव मिळत असल्याने महिला केस सांभाळून ठेवत आहेत.

किलोभर केसांवर ग्रॅमभर सोने; केस सांभाळून ठेवण्याचा ट्रेंड
वीस वर्षांनंतर पहिल्याच पतीशी पुनर्विवाह; पत्नीने केला होता दुसरा विवाह

विदेशात भारतीय केसांना अधिक मागणी आहे. त्यापासून विग, हेअर पिसेस बनविले जातात. व्याधीग्रस्त महिलांच्या डोक्यावरील केस निघून जातात त्यांना हेच विग वापरावे लागतात. मागील वर्षभरात लॉकडाउनमुळे केस खरेदीवर मोठा परिणाम झाला होता, आता या व्यवसायाला तेजी आली आहे.

ग्रामीण व शहरी भागात किरकोळ विक्रेते केस खरेदी करतात. सोबत पिशवी व अमूल्य वस्तू मोजण्यासाठी तराजू असतो. दर महिन्याला ग्रामीण भागात एक ते दोन किलो केस जमा होतात. मोठे व्यापारी या किरकोळ व्यापाऱ्यांकडून ठोक भावात केस खरेदी करतात. काळ्या व निरोगी केसांना जास्त भाव मिळतो. सरळ व कुरळे, काळे, लाल असेही प्रकार असतात. भारतातून युरोप, आफ्रिका या देशात केसांची निर्यात होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com