esakal | आजारी पत्नीला घेऊन ते जात होते दवाखान्यात, अन्‌ काळ आला आडवा 
sakal

बोलून बातमी शोधा

Titare

तालुक्‍यातील कावली येथील माजी सरपंच राजेंद्र गुलाब तितरे (वय 56) व त्यांच्या पत्नी रजनी तितरे (वय 50) हे दोघे दुचाकीने (एमएच 27-आर 2101) धामणगाव येथून यवतमाळ येथे रुग्णालयात जात होते. दरम्यान, यवतमाळजवळील करळगाव घाटात विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या टिप्परने (एमएच 29-टी 1658) दुचाकीला जोरदार धडक दिली.

आजारी पत्नीला घेऊन ते जात होते दवाखान्यात, अन्‌ काळ आला आडवा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धामणगावरेल्वे (जि. अमरावती)  : आजारी पत्नीला डॉक्‍टरांकडे दाखविण्यासाठी धामणगाव येथून यवतमाळ येथील रुग्णालयात दुचाकीने जात असताना टिप्परने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार माजी सरपंच यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता.19) सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. 

भरधाव टिप्परची दुचाकीला धडक

तालुक्‍यातील कावली येथील माजी सरपंच राजेंद्र गुलाब तितरे (वय 56) व त्यांच्या पत्नी रजनी तितरे (वय 50) हे दोघे दुचाकीने (एमएच 27-आर 2101) धामणगाव येथून यवतमाळ येथे रुग्णालयात जात होते. दरम्यान, यवतमाळजवळील करळगाव घाटात विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या टिप्परने (एमएच 29-टी 1658) दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार राजेंद्र तितरे व त्यांच्या पत्नी रजनी तितरे दोघेही दूर फेकले गेले. राजेंद्र तितरे यांना डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी रजनी यांचा उपचारादरम्यान यवतमाळ येथील डॉ. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघाताचा तपास पोलिस निरीक्षक धनंजय सहारे करीत आहेत. मृत राजेंद्र तितरे व रजनी तितरे यांच्या पश्‍चात मुलगा अविनाश व बराच मोठा आप्त परिवार आहे. 

अवश्‍य वाचा- अंकिताला जाळणाऱ्या आरोपीने कारागृहात केला आत्महत्येचा प्रयत्न ​

आज कावलीत अंत्यसंस्कार

कावलीचे माजी सरपंच राजेंद्र तितरे व रजनी तितरे यांच्यावर कावली येथे उद्या, गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.