जगण्याने छळले होते...आता मरणही छळते आहे...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

धर्मा कुरवते (रा. अंभोरा), असे मृताचे नाव आहे. यवतमाळ जिल्हा रेडझोनमध्ये असल्याने ग्रामीण व शहरी जनतेत भीतीचे वातावरण आहे. केळापूर तालुकादेखील त्याला अपवाद नाही. देशी व विदेशी दारूची दुकाने बंद आहेत. दारूच प्यायला मिळत नसल्याने अनेक तळीराम गावठी दारूकडे वळले आहेत. अशातच तालुक्‍यातील ताडउमरीचा जावई असणारा मुळचा अंभोरा येथील रहिवासी धर्मा कुरवते याने झंझारपूर येथे अवैधरीत्या गाळण्यात आलेली दारू जास्त प्रमाणात प्राशन केली. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले.

पांढरकवडा (जि. यवतमाळ) : कोरोना विषाणूमुुुळे प्रत्येकच माणूस भयभीत झाला आहे. लॉकडाऊनमुळे जनजीवन ढवळून निघाले आहे. सध्याच्या परिस्थितीत कशानेही मृत्यू झाला तरी अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. त्यातून दु:खात असलेल्या नातेवाईकांनाही अनेक यातना सहन कराव्या लागत आहे. पांढरकवडा तालुक्‍यातील एका तरुणाचा सहा दिवसांपूर्वीच वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. मात्र, डॉक्‍टरांनी कोरोनाची टेस्टचा रिझल्ट येण्यापूर्वी अंत्यसंस्कार करायचे नाही, असा निर्णय घेतला होता. प्रशासनाकडून अंत्यसंस्काराला हिरवा कंदील दाखविण्यात आला. मात्र, गावातून नकार मिळाल्याने अंत्यसंस्काराचा पेच निर्माण झाला आहे.

अवश्य वाचा - तुम्ही रोगयुक्त फळे तर खात नाही ना?

धर्मा कुरवते (रा. अंभोरा), असे मृताचे नाव आहे. यवतमाळ जिल्हा रेडझोनमध्ये असल्याने ग्रामीण व शहरी जनतेत भीतीचे वातावरण आहे. केळापूर तालुकादेखील त्याला अपवाद नाही. देशी व विदेशी दारूची दुकाने बंद आहेत. दारूच प्यायला मिळत नसल्याने अनेक तळीराम गावठी दारूकडे वळले आहेत. अशातच तालुक्‍यातील ताडउमरीचा जावई असणारा मुळचा अंभोरा येथील रहिवासी धर्मा कुरवते याने झंझारपूर येथे अवैधरीत्या गाळण्यात आलेली दारू जास्त प्रमाणात प्राशन केली. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले.
डॉक्‍टरांनी त्याचा मद्यप्राशनाचा इतिहास न विचारता थेट कोरोनाचे सॅंम्पल घेण्याचे आदेश दिले. रिपोर्ट येईपर्यंत विलगीकरण कक्षात ठेवण्याचे आदेश दिले. मात्र, धर्माचा एकाच दिवसात उपचाराविना मृत्यू झाला. दरम्यान धर्मा कुरवते याचा कोरोनाचा रिपोर्ट आल्याशिवाय त्याचा मृतदेह कुटुंबाला देता येणार नाही, असे धर्माच्या वडिलांना प्रशासनाने कळविले. मुलाचा मृतदेह आणण्यासाठी दोनवेळा वडील पंधराशे रुपयाचा ऑटो करून गेले. मृतदेह आपल्याकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी केली. मात्र, प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहिले. विलगीकरण कक्षात धर्माने अखेरचा श्‍वास घेतला. त्यामुळे मृतदेह ताडउमरी येथे आणू द्यायचा नाही, असा निर्णय सरपंच, पोलिस पाटील आणि गावकऱ्यांनी घेतला. धर्माच्या वडिलांनीही आता मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. सरकारनेच काय ते करावे, असे तहसीलदारांना लेखी लिहून दिले आहे.

Video : तुकाराम मुंढे साहेबऽऽ, दारूविक्रीला तुम्ही का विरोध करीत आहात?

ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

धर्माचा मृत्यू अतिमद्यप्राशनाने झाला. मात्र, त्याला कोरोना झाला होता, अशी अफवा गावात पसरली. धर्मा कुणाकुणाच्या संपर्कात आला. याची चौकशी करण्यात आली. झुंझारपूर व ताडउमरी येथील लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

मले कोरोना नव्हता झाला...

मृत धर्माचा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयात सहा दिवसांपासून शवविच्छेदन गृहात ठेवलेला आहे. सुरुवातीला प्रशासनाने मृतदेह देण्यास टाळाटाळ केली. आता गावातही अंत्यसंस्कार करण्यास विरोध करण्यात आला. "मले कोरोना झाला नव्हता, माझा अंतिम संस्कार करा", असा टाहो तर, धर्मा फोडत नसेल ना?

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: his dead body waiting for funeral