चंद्रपूरकरांच्या आनंदाला उधाण; ‘आय लव्ह चंद्रपूर'मुळे वाढली शहराची शोभा; बिनधास्त घ्या सेल्फी

Vidarbh news, vidarbha marathi news, Marathi news, chandrapur news, I love
Vidarbh news, vidarbha marathi news, Marathi news, chandrapur news, I love

नागपूर : विदर्भातील सर्वात जास्त वनसंपत्तीनं नटलेला जिल्हा म्हणजे चंद्रपूर. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती अभिमानानं चंद्रपूरच आहे म्हणून मिरवत होता. मात्र आजकालच्या ट्रेंडप्रमाणे चंद्रपूर शहरात प्रवेश करताना शहराची ओळख करवून देणारे ‘आय लव्ह चंद्रपूर’ मजकुराचा ग्लो साइन बोर्डच नव्हता. ही बाब लक्षात येताच हा बोर्ड लावण्याची मागणी काही दिवसांआधी नमस्ते चांदा फाउंडेशनने केली होती. खासदार बाळू धानोरकर यांनी त्याची तत्काळ दखल घेतली आणि ग्लो साईन बोर्ड लागला. 

पुणे, मुंबईत मोठ्या पदांवर नोकरीवर असलेले घरी परतले. त्यातून दुरावलेले मित्र एकत्र आले. त्यांनी एकत्र येत नमस्ते चांदा क्लब स्थापन केला. याच क्लबच्या माध्यमातून दुरावलेल्या या बालमित्रांनी समाज चळवळ सुरू केली. चंद्रपूर शहरात देखील मोठ्या शहर प्रमाणे विकास झाला पाहिजे. ही भावना या युवकांनी मनात बाळगली आहे. 

नमस्ते चांदा फाउंडेशनच्या मागणीनंतर खासदार धानोरकर यांनी पाठपुरावा करून काही दिवसांतच ही मागणी पूर्ण केली. त्यामुळे येथील युवकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. कोरोना विषाणूने लॉकडाऊन लागले. यामुळे अनेकांनी घरची वाट धरली. 

मोठ्या शहरात प्रवेश करताना शहराची ओळख एखाद्या फलकाने किंवा वास्तूने होते. परंतु चंद्रपूर येथे मात्र असल्या कोणत्याच प्रकारची वास्तू दिसून येत नाही. चंद्रपूर हे ऐतिहासिक नगरी आहे. गोंड राजाच्या वारसा ह्या शहराला लाभला आहे. 

ताडोबा राष्ट्रीय उद्यान, मोठे उद्योग, अनेक महत्वाची ठिकाणे आणि वारसा या शहराला लाभला आहे. त्यामुळे या शहराची ओळख नवीन पिढीला होण्याकरिता नमस्ते चांदा फाउंडेशनने खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे इतरही मागण्या केल्या आहेत. त्यांपैकी पडोली परिसरात भव्य प्रवेशद्वार लवकरच उभारण्यात येईल, अशी ग्वाही खासदार धानोरकर यांनी युवकांना दिली आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com