वर्धा : अवैध गर्भपात 'अभ्यास' गटाच्या हाती जुनीच माहिती

अभ्यास करून करणार अहवाल सादर, आरोग्य विभागाचा अहवाल ताब्यात
illegal abortion case Study
illegal abortion case Studysakal

वर्धा : आर्वी येथील अवैध गर्भपात (Illegal Abortion)प्रकरणाचा अभ्यास करण्याकरिता आलेल्या नव्या अभ्यासगटाच्या हाती जुनीच माहिती आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात कोणताही दोषी सुटणार नाही, याकरिता राज्य शासनाने अभ्यास गटाची स्थापना केली. कदम रुग्णालयात झालेल्या अनागोंदीबाबत आश्चर्य व्यक्त करीत कुठलाही नवी माहिती (New Information)हाती आली नसल्याचे सांगत अभ्यासगटाकडून रात्री उशिरापर्यंत जिल्हा रुग्णालयात तपास सुरूच होता.

illegal abortion case Study
‘ईडी’ कारवाईवरून पंजाबमध्ये वाक्‌युद्ध

या अभ्यास गटाने आर्वी रुग्णालयाची पाहणी केली. पोलिसांची भेट घेतली. आरोग्य विभागाशी चर्चा केली. यात त्यांनी आरोग्य विभागाचा अहवाल ताब्यात घेतला. शिवाय पोलिसांच्या तपासाची दिशा जाणून घेतली. पोलिस आतापर्यंत अवैध गर्भपात प्रकरणाचा तपास करीत होते. परंतु, काल दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर त्यांच्याकडून इतर तपासाकडे लक्ष देण्यात येत आहे. या सर्व प्रकारात त्यांच्या हाती नवी कुठलीही माहिती आली नसल्याने याच बाबींवर तपास होणार असल्याचे आता पुढे येत आहे. पोलिस प्रशासनाने कारवाई करीत डॉ. रेखी कदम आणि डॉ. नीरज कदम यांना अटक केली. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोग्य विभागाच्या तक्रारीवरून नव्याने कदम परिवारातील चारही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

illegal abortion case Study
वीज पुरवठा खंडित करण्यासंदर्भातील मेसेज फेक , महावितरणचे आवाहन

या प्रकरणात सापडलेल्या १२ कवट्या आणि ५४ हाडांचा रासायनिक तपासाचा अहवाल अद्याप आला नसल्याने तो आल्यानंतरच काय तो अहवाल सादर होणार आहे. या प्रकरणाचा अभ्यास करण्याकरिता आलेल्या गटाने बुधवारी तब्बल दोन तास जिल्हा रुग्णालयात घालवले. यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या कारभारावर ताशेरे ओढले. यात उपस्थित अधिकाऱ्यांना कायद्याची माहिती देण्यात आली. तत्पूर्वी मंगळवारी (ता. १८) अभ्यासगटाच्या सदस्यांनी आर्वी येथील कदम रुग्णालयात भेट दिली. येथे त्यांनी तासभर घालवत ग्रामीण रुग्णालयाच्या कारभाराची पाहणी पाहणी करून पोलिस ठाणे गाठत पोलिसांकडून या प्रकरणाची माहिती जाणून घेतली. येथून रवाना झाल्यानंतर या अभ्यासाचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे समितीकडून सांगण्यात आले.

रात्री उशिरापर्यंत जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती

आर्वी येथील कदम रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयाची माहिती घेत रात्री उशिरा वर्ध्यात दाखल झालेल्या अभ्यास गटाने सकाळी जिल्हा रुग्णालयात भेट देत पाहणी केली. यात दुपारी पुन्हा रुग्णालयाची झाडाझडती घेतली. रात्री उशिरापर्यंत या रुग्णालयाचा तपास सुरूच होता. प्रकरण उघड झाले त्या काळापासून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस कोरोना पॉझिटिव्ह(Corona Positive) असल्याने बाहेर होते. ते आज प्रथमच या प्रकरणात आलेल्या अभ्यासगटासमोर आले.(Vidarbha News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com