esakal | मेळघाटच्या निसर्गसंपन्नतेवर नक्की कोणाची वक्रदृष्टी? होतंय अवैध उत्खनन; महसूल प्रशासनाचं दुर्लक्ष

बोलून बातमी शोधा

illegal digging is going on in Melghat Amravati district }

चिखलदरा तालुक्‍यातील टेंब्रूसोंडा सर्कलमधील बोराळा परिसरात हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. दिवस-रात्र येथून मुरूम, डब्बर उत्खनन करून वाहून नेले जात आहेत. परंतु महसूल प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.

मेळघाटच्या निसर्गसंपन्नतेवर नक्की कोणाची वक्रदृष्टी? होतंय अवैध उत्खनन; महसूल प्रशासनाचं दुर्लक्ष
sakal_logo
By
राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) : कोरोनाच्या संकटात कंत्राटदारांकडून गेल्या काही महिन्यांपासून मेळघाटात अवैध उत्खनन जोरात सुरू आहे. चिखलदरा व धारणी तालुक्‍याच्या चारही बाजूंना असलेल्या टेकड्या, डोंगर पोखरण्याचे काम केले जात असून त्याकडे महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. या प्रकारामुळे पर्यावरण धोक्‍यात आले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

चिखलदरा तालुक्‍यातील टेंब्रूसोंडा सर्कलमधील बोराळा परिसरात हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. दिवस-रात्र येथून मुरूम, डब्बर उत्खनन करून वाहून नेले जात आहेत. परंतु महसूल प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे या प्रकारात महसूलचे काही अधिकारीदेखील सहभागी असल्याची शंका नागरिकांकडून उपस्थित केली जात आहे. 

हेही वाचा - अमरावतीतील भानखेडा परिसरातील ३० हजारांवर कोंबड्या नष्ट करणार; ‘बर्ड फ्लू’ संक्रमित...

या गैरप्रकाराबाबत अनेकदा स्थानिक सामाजिक संघटनांनी महसूल प्रशासनाकडे तक्रारी केल्या, परंतु त्यांची दखल घेण्यात आलेली नाही. काही वेळा तक्रारीनंतर महसूलचे अधिकारी याठिकाणी नुसता फेरफटका मारून निघून जातात. मात्र कारवाईला बगल दिली जाते, हा सारा प्रकार परवानगीशिवाय सुरू आहे. त्यात अनेक बडे मासे गुंतलेले आहेत. त्यामुळेच कारवाई करण्यास महसूलचे अधिकारी धजावत नसल्याची परिसरात चर्चा आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन कार्यवाहीची मागणी समोर येत आहे.

सपाटीकरण नावालाच

बोराळा परिसरात जी परवानगी मिळाली ती सपाटीकरणाच्या नावावर मिळाली आहे. मात्र याठिकाणी संपूर्ण डोंगर पोखरण्याचे काम पोकलॅंडच्या माध्यमातून सुरू असल्याचे दिसून येत आहे. महसूल विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना उत्खनन होत असल्याचे दिसत नाही, ही आचर्याची बाब म्हणावी लागेल. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर या परिसरात मोठमोठाली खड्डे खोदून ठेवल्याने पावसाळ्याच्या दिवसांत पाणी साचून एखादी मोठी अनुचित घटना घडण्याची दाट शक्‍यता नाकारता येत नाही. करिता याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

नक्की वाचा - चंद्रपुरात आदिवासी बांधवांचा उपोषणाचा इशारा; मनपानं क्रांतिवीर बिरसा मुंडांचा पुतळा हटवल्यामुळे...

सपाटीकरणाच्या नावावर परवानगी देण्यात आली आहे. मात्र जो कोणी सपाटीकरणाच्या नावावर डोंगर पोखरून पर्यावरणाला हानी पोहोचविण्याचे काम करीत असेल तर परिसरात जाऊन चौकशी करण्यात येईल व दोषी आढळल्यास निश्‍चित कारवाई करण्यात येईल.
-माया माने
तहसीलदार चिखलदरा.

संपादन - अथर्व महांकाळ