esakal | दारूबंदीची अंमलबजावणी कठोरपणे करा; कुरखेड्यातील 76 गावांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

Implement wine ban properly in gadchiroli district

कुरखेडा तालुक्‍यातील 76 गावांनी दारूबंदी टिकविण्यासाठी ठराव घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.

दारूबंदीची अंमलबजावणी कठोरपणे करा; कुरखेड्यातील 76 गावांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

sakal_logo
By
खुशाल ठाकरे

कुरखेडा (गडचिरोली) : सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते व जनतेच्या प्रयत्नांमुळे राज्य शासनाने 1993 मध्ये जिल्ह्यात दारूबंदी लागू केली. सध्या दारूबंदी उठविण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मात्र, जिल्ह्यातील 791 गावांना दारूबंदी कायम हवी आहे. कुरखेडा तालुक्‍यातील 76 गावांनी दारूबंदी टिकविण्यासाठी ठराव घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.

उराडी, खरकाडा, बेलगाव, हेटीनगर, शिरपूर, चांदागड, मोहगाव, गोठणगाव, जांभूळखेडा, गरगडा, वारवी, वडेगाव, आंधळी, अंतरगाव, चिपरी, गांगोली, सावरगाव, दामेश्‍वर, करमटोला, वाढोणा, सोंसरी, धणेगाव, चांदोना, रानवाही, भगवानपूर, गुरनोली, लेंढारी, लक्ष्मीपूर, भटेगाव, डोंगरगाव, शिवणी, मोहगाव, वासी, कोसी, सोनेरांगी, चिरचाडी, कराडी, वाघेडा, घाटी, खैरी, कसारी, बामणी, धानोरी, तळेगाव, जोशीटोला, गेवर्धा, चिखली, पळसगड, खेडेगाव, देऊळगाव, अरततोंडी, कातणवाडा, चिचटोला, नवेझरी, मालेवाडा, फरी, सतिटोला, येंगलखेडा, जामटोला, आंधळी सोन्सरी, पुराडा, बांधगाव, पळसगाव नवेझरी, सावतळा, बदबदा, नान्ही, धमदीटोला, खडकी, चरवीदंड, एडसकुही, नेहारपायली, खोब्रामेंढा, पालापुंडी, मरारटोला, पळसगाव, कसरबोडी या 76 गावांना दारूबंदीची अंमलबजावणी हवी आहे.

जाणून घ्या - नियम शिथिल नागरिक बिनधास्त! वाहनांचा वेग वाढला; अनेकांना गमवावा लागतोय जीव

 या गावांनी जिल्ह्यातील दारूबंदी टिकविण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच जिल्ह्यातील दारूबंदीत ढिलाई न देता दारूबंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी या पत्रांद्वारे केली आहे.

14 रुग्णांवर उपचार

मुलचेरा व एटापल्ली तालुका कार्यालयात मुक्तिपथ अभियानाच्या वतीने आयोजित व्यसन उपचार क्‍लिनिकच्या माध्यमातून एकूण 14 रुग्णांवर पूर्ण उपचार करण्यात आला. मुलचेरा शहरातील गोंडवाना चौकातील जिल्हा परिषद शाळेजवळील मुक्तिपथ तालुका कार्यालयात व एटापल्ली शहरातील आनंदनगरातील मुक्तिपथ तालुका कार्यालयात दर गुरुवारी व्यसन उपचार क्‍लिनिकचे आयोजन केले जाते. दोन्ही कार्यालयांत 12 ऑक्‍टोबर रोजी आयोजित क्‍लिनिकच्या माध्यमातून एकूण 14 रुग्णांवर उपचार करण्यात आले. 

सविस्तर वाचा - विश्वास बसेल का! एका उंदीरमुळे वृद्धेचे कुटुंब आलं उघड्यावर

यावेळी क्‍लिनिकमध्ये दारूचे व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि तो उपचाराने बरा होतो. दारूची सवय सोडण्यासाठी तसेच यातून उद्‌भवणारा त्रास कमी करण्यासाठी उपचार घेणे आवश्‍यक आहे. दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्‍याचे घटक, नियमित औषधोपचार घेणे आदींची माहिती देत व्यसनी रुग्णांना समुपदेशन करण्यात आले. मुक्तिपथ तालुका कार्यालयांमध्ये ठराविक दिवशी क्‍लिनिकचे आयोजन केले जाते. दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा असणाऱ्या जास्तीत जास्त रुग्णांनी क्‍लिनिकला भेटद्यावी, असे आवाहन मुक्तिपथ अभियानातर्फे करण्यात आले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ