Indications of hearing on Ankita Pisudde case
Indications of hearing on Ankita Pisudde case

बहुचर्चित हिंगणघाट हत्याकांड : अंकिताला मिळणार न्याय; मिळाले कामकाज सुरू होण्याचे संकेत

वर्धा : दिवस तीन फेब्रुवारीचा... अंकिता पिसुड्डे महाविद्यालयात शिकविण्यासाठी जात होती... विकेश ऊर्फ विक्‍की नगराळेने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले... यात ती गंभीर भाजली गेली... नागपूर येथे उपचार सुरू असताना तिचा ११ फेब्रुवारीला मृत्यू झाला... सदर प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी झाली... सरकारकडूनही त्याला हिरवी झेंडीही मिळाली... परंतु, देशात कोरोना संसर्गाने थैमान घातले व सर्वत्र लॉकडाउन झाल्याने हे प्रकरण मागे पडले... मात्र, आता न्यायालयाचे कामकाज सुरू होणार असल्याने या प्रकरणाच्या सुनावणीचे संकेत मिळाले आहे.

अंकिता तीन फेब्रुवारील एसटीने महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली. हिंगणघाट चौकात ती एसटीतून उतरली. तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा विकेश हा तिच्या मागावर होता. चौकात पोहोचताच त्याने अंकिताच्या अंगावर रॉकेल ओतले आणि सोबत आणलेला टेंभा तिच्या अंगावर टाकला. भर रस्त्यात ती मदतीसाठी ओरडत होती. मात्र, कुणीही मदतीसाठी घाऊन आले नाही.

काही अंतरावर असलेल्या अन्य शिक्षकांना ही बाब समजताच मदतीसाठी घाऊन आले. त्यांनी पाणी टाकूण आग विझवली. यात अंकिता साठ टक्के भाजली होती. तिच्यावर नागपुरात उपचार सुरू होता. तब्ब्ल आठ दिवस लढा दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. यानंतर वर्धेत चांगला वाद निर्माण झाला होता. अंकिताला न्याय मिळावा यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले होते.

विकेशला आमच्या स्वाधीन करा, आम्ही त्याचा न्याय करू असे म्हणत रस्ता जाम केला होता. या प्रकरणाची मिहणाभर चांगलीच चर्चा होती. अनेक मोठे व्यावसायिकांनी अंकिताच्या उपचाराचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली होती तर अनेक नेत्यांनी न्यायाची मागणी लावून धरली होती. मात्र, कोरोनामुळे या प्रकरणार सुनावनी होऊ शकली नाही. मात्र, आता राज्याला हादरवून सोडणारे अंकित पिसुड्डे जळीत प्रकरणाच्या सुनावणीचे संकेत मिळाले आहे.

नागपुरातील मध्यावर्ती कारागृहात कैद

अंकिताला पेटवून दिल्यानंतर आरोपी विकेशने घटनास्थळावरून पळ काढला होता. त्याचा शोधासाठी पोलिसांचे पथक पाठविण्यात आले होते. त्‍याला नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट या गावातून अटक करण्यात आली होती. आरोपीला पोलिसांनी घटनेच्या दिवशीच अटक केली. घडलेल्या या प्रकरणाचे देशभर पडसाद उमटले होते. आरोपी विकेश सद्या नागपुरातील मध्यावर्ती कारागृहात कैद आहे.

वकिलांशी बोलणे झाल्याची चर्चा

कोरोनामुळे मागे पडलेले हे प्रकरण लवकरच न्यायालयात येणार आहे. या संदर्भात शुक्रवारी विशेष सरकारी वकिलांचे जिल्हा सरकारी वकिलांशी बोलणे झाल्याची चर्चा न्यायालयाच्या परिसरात होती. सदर प्रकरणाचे वकीलपत्र विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्याकडे असल्याचे यापूर्वीच सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.

साक्षी पुराव्यावर सुनावणी सुरू होणार

सरकारच्या सूचनेनुसार न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून दोन पाळीत सुरू करण्याचे आदेश आहे. हे आदेश येताच रखडलेल्या प्रकरणांचे मार्ग मोकळे झाले आहेत. अशातच अंकिता पिसुड्डे जळीत प्रकरणातील साक्षी पुरावे सुरू करा अशा सूचना गृह विभागाकडून आल्याने लवकरच बहुचर्चित जळीत प्रकरणाच्या साक्षी पुराव्यावर सुनावणी सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. ते कोणत्या कोर्टात चालवायचे या संदर्भात सध्या तरी काही निर्णय झालेला नाही.

प्रकरण सध्या हिंगणघाट न्यायालयात

अंकिता जळीत प्रकरण अद्याप हिंगणघाट न्यायालयातच आहे. येथून ते वर्धा न्यायालयात येणे बाकी आहे. न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर त्यावर निर्णय होणार आहे. प्रकरण वर्ध्यात चालविणे विशेष सरकारी वकिलांना सोयीचे होणार असल्याने ते वर्ध्यातच येईल असे काही विधीतज्ञांचे म्हणणे आहे.

आरोपीला शिक्षा होणे महत्त्वाचे

या संदर्भात महिनाभरापूर्वी सरकारी वकिलांशी बोलणे झाले होते. त्यांनी एक महिनानंतर सदर प्रकरण सुरू होईल असे सांगितले होते. सध्या या संदर्भात त्यांच्याकडून काही माहिती आलेली नाही. सरकारने दिलेले सर्वच आश्‍वासन अद्याप बाकी आहे. ते दुय्यम बाब असून, आरोपीला शिक्षा होणे महत्त्वाचे आहे.
- अरुण पीसुड्डे,
अंकिताचे वडील

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com