esakal | मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आले पत्र अन् उडाली एकच खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

inquiry of 8 to 10 grampanchayat work in melghat of amravati

मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या आदेशानुसार 28 व 29 जानेवारीला कुटंगा, चौराकुंड, बाबंदी, झापल, बिजूधावडी, गोलाई, मोगर्दा, बेरदाबाल्डा, साद्राबाडी, टिटंबा या ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आले पत्र अन् उडाली एकच खळबळ

sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : चिखलदरा तसेच धारणी तालुक्‍यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये राजकीय हस्तक्षेप करीत जिल्हा परिषद सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 8 ते 10 ग्रामपंचायतींच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश दिल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ग्रामपंचायतींमध्ये चौकशी समिती धडकणार असल्याने मेळघाटातील जिल्हा परिषद सदस्यांनी आता ही चौकशी रद्द करण्यासाठी धडपड सुरू केली आहे. 

हेही वाचा - युट्यूब बघितले अन् सूचली भन्नाट आयडिया, घरीच फक्त १५ रुपयांत तयार करतोय गावरानी...

मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या आदेशानुसार 28 व 29 जानेवारीला कुटंगा, चौराकुंड, बाबंदी, झापल, बिजूधावडी, गोलाई, मोगर्दा, बेरदाबाल्डा, साद्राबाडी, टिटंबा या ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी दर्यापूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ए. एन. कुलकर्णी, चांदूररेल्वेचे विस्तार अधिकारी जे. एच. देशमुख, अंजनगावचे विस्तार अधिकारी सुनील गवई यांची नियुक्ती केली असून गुरुवार व शुक्रवार, असे दोन दिवस चौकशीचे काम चालणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. ही चौकशी समितीच रद्द करावी, अशी मागणी करीत काही जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या राजकीय दबावाचा वापर सुरू केला आहे. मात्र, सीईओंनी त्यांच्या दबावाला भीक घातली नसल्याची माहिती आहे. धारणी तसेच चिखलदरा तालुक्‍यातील ग्रामपंचातींमध्ये जिल्हा परिषद सदस्यांकडून शासन निर्णयाची पायमल्ली केली जात आहे. ग्रामपंचायत स्तरावर तीन लाखांवरील कामांमध्ये ई-निविदा प्रक्रियेला हरताळ फासण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींच्या कामांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. 

हेही वाचा - खोल पाण्याकडे पाहत घुटमळत होती तरुणी, काही क्षणातच घडलेल्या प्रसंगाने उपस्थितही चक्रावले

या कामांमध्ये झाला भ्रष्टाचार -
अंगणवाडी बांधकाम, पेव्हिंग ब्लॉक, रस्ते, समाजमंदिर, काँक्रिट रस्ते, स्मशानभूमी, सभामंडप बांधकाम, इमारती दुरुस्ती, पाणीपुरवठा योजना इत्यादी कामात पूर्ण कामांचे टेंडर न लावता केवळ साहित्य पुरवठा टेंडर लावून जि. प. सचौकशी समिती रद्द करावी -दस्य आपापल्या क्षेत्रातील कामे स्वतःच्या नावे करून कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत असल्याच्या तक्रारीवरून सीईओंनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.   


धारणी तसेच चिखलदरा अंतर्गत ग्रामपंचायतींची चौकशी करण्यासाठी गठित करण्यात आलेली चौकशी समिती तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी मेळघाटातील काही जिल्हा परिषद सदस्यांनी निवेदनातून केली आहे.