बाप रे! गेल्या सहा महिन्यात तब्बल ९० एचआयव्ही रुग्ण; तीन गर्भवती महिलांचाही समावेश 

सुधीर भारती 
Sunday, 29 November 2020

कोविड 19 च्या काळात एचआयव्ही अंतर्गत कार्यक्रमावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. तपासणी सुद्धा बाधित झाली होती. एप्रिल ते ऑक्‍टोबर या काळात झालेल्या एचआयव्ही तपासणीत 90 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. 

अमरावती ः जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत 90 एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एप्रिल ते ऑक्‍टोबर या सहा महिन्याच्या कालावधीत एकूण 36 हजार 785 व्यक्तीची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 90 व्यक्तींना एचआयव्हीची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये 3 गर्भवती मातांचा सुद्धा समावेश आहे.

कोविड 19 च्या काळात एचआयव्ही अंतर्गत कार्यक्रमावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. तपासणी सुद्धा बाधित झाली होती. एप्रिल ते ऑक्‍टोबर या काळात झालेल्या एचआयव्ही तपासणीत 90 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. 

क्लिक करा - सावधान! .फेसबूकच्या `मार्केट प्लेस’वरून खरेदी करताय? होऊ शकते लाखोंची फसवणूक

जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, चार उपजिल्हा रुग्णालय, 9 ग्रामीण रुग्णालये, 59 प्राथमिक आरोग्य केंद्र, क्षय रुग्णालय, 58 खासगी रुग्णालये, शासकीय रक्तपेढी, तसेच 4 खासगी रक्तपेढ्यांमध्ये एचआयव्हीची माहिती तसेच तपासणी मोफत केली जाते. 

पॉझिटिव्ह निघाल्यानंतर पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयातील एआरटी केंद्र व उपजिल्हा रुग्णालय मोर्शी, अचलपूर, दर्यापूर, धारणी, ग्रामीण रुग्णालय वरूड, नांदगावखंडेश्‍वर, धामणगावरेल्वे व तिवसा येथे लिंक एआरटी सुविधा केंद्र असून तेथे उपचाराबाबत मार्गदर्शन केले जात आहे.

1 डिसेंबरला जागतिक एड्‌स दिन

1 डिसेंबरला जागतिक एड्‌स दिवस साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त जिल्ह्यातील विविध केंद्रांवर प्रकल्प संचालक चंद्रकांत डांगे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अजय साखरे यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा - काय सांगता! आज रविवार आहे, अंत्यसंस्कार विधी होणार नाही! ही आहे अडचण

नियमित औषधपुरवठा

कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात एचआयव्ही बाधितांशी संपर्क साधणे कठीण बाबा होती, मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या एआरटी चमूने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत एचआयव्ही बाधितांपर्यत औषध पुरवठा केला.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New 90 HIV patients are in Amravati district