
कारंजा तालुक्यातील खैरी हे गाव कार नदी प्रकल्पावर बांधलेल्या धरणात गेले. त्यामुळे पुनर्वसित होऊन गाव वेगळे झाले. गावाची निमिर्ती झाली त्या काळापासून येथे सुविधांची वानवा निर्माण झाली
कारंजा (घा.)(जि.वर्धा) : तालुक्यातील जऊरवाडा- खैरी गटग्रामपंचायतमध्ये असलेल्या खैरी या पुनर्वसित गावाने शुक्रवारी मतदानावर बहिष्कार टाकला. केवळ मतदानावर बहिष्कार टाकून हे मतदार थांबले नाहीत, तर समस्या जगापुढे याव्या यासाठी चूलबंद आणि अन्नत्याग आंदोलन देखील केले. गावाचे पुनर्वसन झाले तेव्हापासूनच गावातील सुविधांकडे सतत दुर्लक्ष होत आले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला.
हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : ...अन् अंकिताच्या आईला रडू कोसळले; भावूक झाल्याने १५ मिनिटे कामकाज थांबले
कारंजा तालुक्यातील खैरी हे गाव कार नदी प्रकल्पावर बांधलेल्या धरणात गेले. त्यामुळे पुनर्वसित होऊन गाव वेगळे झाले. गावाची निमिर्ती झाली त्या काळापासून येथे सुविधांची वानवा निर्माण झाली. या सुविधा आज नाही तर उद्या मिळतील या प्रतीक्षेत गावकरी होते. पण सुविधा मिळाल्या नाही. यामुळे गावकऱ्यांनी स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी केली. याला २० वर्षांचा काळ झाला. पण, प्रशासनाला जाग आला नाही. यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी अखेर मागणीच्या पूर्ततेसाठी गावात आंदोलन पुकारले. या आंदोलनाचीही प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. यामुळे गावकऱ्यांनी निवडणुकीच्या दिवशी चूलबंद आंदोलन करून मतदानावर बहिष्कार टाकला.