esakal | राऊत साहेबऽऽ अशा भांडणांना तुम्ही तर जबाबदार नाही ना?, वाचा सविस्तर...
sakal

बोलून बातमी शोधा

In Khamgaon, the doctor beat the compounder

चिडलेल्या डॉ. अग्रवाल यांनी अनेकवेळा शिवीगाळ केली. त्यांच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी विठ्ठलला लाथाबुक्क्यांनी पाठीवर, तोंडावर व हातावर मारहाण केली. येवढ्यावच ते थांबले नाही तर पायावर लोखंडी रॉडने मारले, असेही विठ्ठलने तक्रारीत नमूद गेले आहे.

राऊत साहेबऽऽ अशा भांडणांना तुम्ही तर जबाबदार नाही ना?, वाचा सविस्तर...

sakal_logo
By
संजय जाधव

बुलडाणा : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी डॉक्टर आणि कम्पाऊंडरबद्दल वक्तव्य केले होते. ‘मी डॉक्टरांकडून नव्हे तर कम्पाऊंडरकडून औषध घेतो' हे त्यांचे विधान होते. यामुळे राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्र ढवळून निघत आहे. आता डॉक्टर व कम्पाऊंडरमध्ये वादावादी आणि भानगडी होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ‘राऊत साहेबऽऽ अशा भांडणांना तुम्ही तर जबाबदार नाही ना?' असा प्रश्न नागरिक एकमेकांना विचारत आहे, चला तर जाणून घेऊया काय आहे प्रकार...

कम्पाऊंडरच्या तक्रारीनुसार, खामगाव येथील डॉ. आशीष अग्रवाल यांच्या हॉस्पिटलमध्ये विठ्ठल महाले हा कम्पाऊंडर म्हणून काम करीत होता. डॉ. अग्रवाल यांनी १२ ऑगस्टला विठ्ठलला फोन करून हॉस्पिटलमध्ये बोलावले होते. तेव्हा विठ्ठल खामगावात कामानिमित्त आलेला असल्यामुळे तो लगेच हॉस्पिटलमध्ये गेला. विठ्ठलने ‘मला कशासाठी बोलावले, असे डॉ. अग्रवाल यांना विचारले. डॉ. अग्रवालने विठ्ठलला चढ्या आवाजात ‘तू माझ्या हॉस्पिटलमध्ये काम का करीत नाही, असे विचारले.

सविस्तर वाचा - हड्डीजोड की कंबरमोड? या गावात घरोघरी आहेत दवाखाने.. पण सत्य मात्र भलतेच...

चिडलेल्या डॉ. अग्रवाल यांनी अनेकवेळा शिवीगाळ केली. त्यांच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी विठ्ठलला लाथाबुक्क्यांनी पाठीवर, तोंडावर व हातावर मारहाण केली. येवढ्यावच ते थांबले नाही तर पायावर लोखंडी रॉडने मारले, असेही विठ्ठलने तक्रारीत नमूद गेले आहे. विठ्ठल महालेला गंभीर दुखापत झाल्याने खामगाव सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अकोला येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

गुन्हा दाखल करण्यास विलंब

डॉ. अग्रवालने विठ्ठल महालेला एक महिन्याचे वेतनसुद्धा दिलेले नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. डॉ. अग्रवाल हे गुंडगिरी प्रवृत्तीचे असल्याचेही सांगण्यात येते. यापूर्वीसुद्धा त्यांनी असे प्रकार केल्याची माहिती आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास लावलेल्या विलंबाबतही खामगावात उलटसुलट चर्चा होत आहेत.

हेही वाचा - नागपूर ग्रामीण ब्रेकिंगः अखेर विहिरीत पडलेला एक मूषक ठरला ‘त्या’ तिघांचा काळ ...

माझ्या जिवाचे बरे वाईट झाले तर डॉ. अग्रवाल जबाबदार राहतील

‘यापुढे माझ्या हॉस्पिटलमध्ये दिसलास तर ठार मारून टाकेल व खोट्या विनयभंगाच्या केसमध्ये तुला अडकवून टाकेल’ अशी धमकी दिल्याचेही विठ्ठलने तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या या धमकीमुळे व मारहाणीमुळे मी व माझे कुटुंबीय अत्यंत घाबरलेलो आहोत. डॉ. आशीष अग्रवाल यांच्यापासून जीविताला धोका निर्माण झाला आहे. माझ्या जिवाचे बरे वाईट झाले, तर याला डॉ. आशीष अग्रवाल हेच जबाबदार राहतील, असे विठ्ठल महालेने तक्रारीत म्हटले आहे.

जलंब नाक्यावर मारहाण

विठ्ठलच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. आशीष अग्रवाल व अन्य दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. डॉ. अग्रवाल यांनी काही गावगुंडांकरवी मारहाण केली. खामगाव येथील जलंब नाक्यावर मारहाण केल्याची तक्रार विठ्ठल महाले याने पोलिस ठाण्यात दिली आहे. कम्पाऊंडरच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहितीसाठी - पतीला तिळतिळ मरताना बघू शकत नाही.. असं म्हणत तिनं उचललं टोकाचं पाऊल.. आणि सगळंच संपलं

संपादन - नीलेश डाखोरे