विधानसभेपूर्वी 'हे' घेणार भाजपशी काडीमोड?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता स्थापन झाल्यावर शेतकरी आत्महत्येच्या प्रश्‍नावर उपाय शोधण्यासाठी व शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सरकारने कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची स्थापना केली. या मिशनच्या अध्यक्षपदी शेतकरी नेते, शेतकरी आत्महत्येवरून सरकारला वारंवार धारेवर धरणारे व शेतकर्‍यांच्या हितासाठी सतत संघर्ष करणारे नेते म्हणून विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांची नियुक्ती केली.

यवतमाळ : कै. वसंतराव नाईक नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी भाजपशी काडीमोड घेण्याचे विधान केल्यानंतर शेतकरी मिशनच्या कामाचा वेग आणखी वाढविला आहे. त्यामुळे सध्यातरी ते सत्तेसोबतच असून त्यांनी भाजपशी केवळ काडीमोड घेण्याची वल्गना केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मी पस्तावतोय बॅनरने कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचे स्वागत

राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता स्थापन झाल्यावर शेतकरी आत्महत्येच्या प्रश्‍नावर उपाय शोधण्यासाठी व शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सरकारने कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची स्थापना केली. या मिशनच्या अध्यक्षपदी शेतकरी नेते, शेतकरी आत्महत्येवरून सरकारला वारंवार धारेवर धरणारे व शेतकर्‍यांच्या हितासाठी सतत संघर्ष करणारे नेते म्हणून विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांची नियुक्ती केली. त्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा देण्यात आला. गेल्या पाच वर्षांत त्यांनी सत्तेत राहून शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर सरकारला सल्ले दिले.

'मुझे छोड दो भैया' म्हणूनही ते नराधम थांबले नाहीत

शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी बँका, अधिकारी व कर्मचार्‍यांना धारेवर धरले. गेल्या काही दिवसांत शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर अधिकार्‍यांकडून दुर्लक्ष केल्याचे त्यांना सतत खडकत असल्याने त्यांनी यवतमाळ येथे पत्रकार परिषद घेऊन भाजपसोबत काडीमोड घेणार असल्याचे विधान केले. तत्पूर्वी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून ते भाजपला सोडून सेनेसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. परंतु, याबाबत त्यांनी प्रत्यक्ष कुठेही वाच्यता केली नाही. याउलट त्यांनी 17 व 18 या दोन्ही दिवशी शेतकरी मिशनचे विविध कार्यक्रम, बैठका यवतमाळ जिल्ह्यात लावल्या आहेत.

HappyBirthdayPM : मोदी भक्ताकडून सोन्याचा मुकूट अर्पण

त्यात शेतकर्‍यांना पीककर्ज मिळवून देणे, जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेणे, वीजग्राहकांचे प्रश्‍न सोडविणे, अंत्योदयची प्रगती, पिककर्जाचे पुनर्गठण आदींचा आढावा घेण्यासाठी बैठका लावल्या आहेत. सध्यातरी त्यांनी भाजपशी काडीमोड घेतला नसून ते शेतकरी मिशनचेच काम करीत आहेत. याबाबत त्यांना विचारले असता बँकेचे अधिकारी शेतकर्‍यांना कर्ज देत नाहीत. वरिष्ठ अधिकारी दखल घेत नाही. त्यामुळे सरकारमध्ये राहायचे कशाला, असा प्रतिप्रश्‍न केला. याबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kishor Tiwari not contest assembly election with BJP