औषधांचा तुटवडा, कर्मचाऱ्यांची रिक्तपदे; कसे लढणार या महारोगाशी

upkendra.jpg
upkendra.jpg

पांगरी नवघरे (जि. वाशीम) : परिसरातील ग्रामस्थांना आरोग्य विषयक सोयी-सुविधा देण्यासाठी पांगरी नगवघरे येथे आरोग्य उपक्रेंद्राची निर्मिती करण्यात आली. मात्र, या आरोग्य उपक्रेंद्रात औषधांचा तुटवडा, कर्मचाऱ्यांची रिक्तपदी अशा विविध सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे परिसरातील रुग्णांची गैरसोय होत आहे. या आरोग्य उपकेंद्रात तत्काळ सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

उपकेंद्राचा उपयोग काय
सध्या हवामानतील बदल आणि कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अशा वेळी प्रत्येकाला आरोग्य केंद्राची आवश्‍यकता वाटत आहे. दवाखान्यात गर्दी वाढली आहे. मात्र, आरोग्य उपकेंद्रात सुविधांचा अभाव असल्याने ग्रामस्थांना खासगी दवाखान्याचा सहारा घ्यावा लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. स्थानिक व मोठ्या लोकसंख्या असलेल्या गावांना आरोग्य उपकेंद्र चालविण्याचे ठरविले या आरोग्य उपकेंद्रद्वारे ग्रामीण भागातील जनतेला योग्यवेळी उपाययोजना होत असल्यामुळे त्यांना तालुकास्तरावर येण्याची गरज भासणार नाही. अशी शासनाची अपेक्षा होती. मात्र, अनेक आरोग्य उपकेंद्र शोभेची वस्तू बनली आहे. कारण ग्रामीण भागाची पहाट ही सकाळपासून सुरुवात होती. गाव पातळीवर अनेक नागरिकांना आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरीला जावे लागते. शिवाय कुठल्याही नागरिकांनी जर डॉक्‍टरांना विचारले मला या संबंधित गोळी पाहिजेत तर यांच्याकडून लगेच उत्तर येतं की, या गोळ्यांचे आम्हाला वरून वाटप झालेला नाही. त्यामुळे ते आमच्या जवळ नसल्यामुळे आपणास देऊ शकत नाही. ज्या ठिकाणी आजारासंदर्भात औषधी नसतील तर अशा उपकेंद्राचा उपयोग काय असा प्रश्‍न गावकऱ्यांना पडला आहे.

अनेक औषधांची मागणी
अनेक ग्रामीण भागातील उपकेंद्राच्या रंगरंगोटीचे कार्यक्रम चालू आहेत. ग्रामीण भागातील उपकेंद्राच्या रंगरंगोटी केल्यापेक्षा त्या उपकेंद्रांमध्ये काय सुविधा आहेत हा महत्त्वाचा विषय आहे. बाहेरून आलेल्या कोरोना बाधित क्षेत्रातून नागरिकांना तपासण्याकरिता योग्य ती सुविधा पुरवण्याचे काम संबंधित यंत्रणेकडून व्हायला पाहिजे. पण तसे न करता अत्यंत आवश्‍यक सुविधा सुद्धा पुरविल्या जात नसल्याचे चित्र आहे. उपकेंद्राला अत्याधुनिक सुविधांची फार गरज आहे. पांगरी नवघरे उपकेंद्र जवळ तीन गावांचा कारभार चालतो. आजरोजी पूर्ण जगाला कोनोरा सारख्या महाभयंकर बिमारीने व्यापले आहे. अशा उपकेंद्रांमध्ये किमान डॉक्‍टरने आलेल्या रुग्णाला मार्गदर्शन जरी केले तरी त्या पेशंटचा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. परंतु या उपक्रेंद्रात सध्या खोकल्याची औषधी सुद्धा उपलब्ध नाही. आज नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. साधा खोकला जरी झाला तरी लोकांना असे वाटते की, आपल्याला कोरोनाची लागण झाली की काय, संबंधित यंत्रणांनी याची दखल शासनाजवळ योग्य तो पाठपुरावा करून ग्रामीण भागातील सर्व उपकेंद्राला हव्या असलेल्या सर्दी, ताप, खोकला इत्यादी सामग्री साहित्य उपलब्ध करून द्यावे जेणेकरून नागरिकांना वेळीच उपचार मिळाल्यामुळे पुढील होणारे अनर्थ टळू शकतो, अशी मागणी गावातील सीताराम नामदेव नवघरे, विवेक नवघरे, पंजाब शिंदे, केशव नवघरे, अश्विन नवघरे, अमोल गणेश नवघरे, रामा उदयेभान नवघरे आदींनी केली आहे.

संशयितांची केली तपासणी
कोरोना विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी सध्या संपूर्ण प्रशासन कामाला लागले आहे. या पार्श्वभूमिवर पांगरी नवघरे येथील डॉक्‍टरांनी गावातील काही संशयित रुग्णांची तपासणी केली. त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. आरोग्य केंद्रातील डॉक्‍टरांच्या या तत्परतेमुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.


औषधसाठा लवकरच पुरवणार 
पांगरी नवघरे येथील आरोग्य उपकेंद्रात खोकल्याच्या व इतर औषधाचा पाठपुरवठा वरील संस्थेच्याद्वारे केला जातो. आमच्याकडे जेवढाही साठा उपलब्ध होईल तेवढा औषधसाठा लवकरात लवकरच संबंधित उपकेंद्राला पाठविला जाणार आहे.
-डॉ. बोरसे, तालुका आरोग्य अधिकारी, मालेगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com