ग्रामपंचायत निवडणूक: गावपुढाऱ्यांना प्रचारासाठी मिळणार अवघे 11 दिवस; 23 डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्रं स्वीकारणं सुरू

Leaders are getting only 11 days for compaining in grampanchayat election
Leaders are getting only 11 days for compaining in grampanchayat election
Updated on

यवतमाळ: गेल्या जवळपास दहा महिन्यांपासून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रतीक्षा लागलेली होती. ही प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतींसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. 23 डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. कोरोनाच्या सावटात होणाऱ्या पहिल्या ग्रामीण भागातील निवडणुकांना प्रचारासाठी 11 दिवस मिळणार आहेत.

मार्च ते एप्रिल या महिन्यांत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील जवळपास चारशेहून अधिक ग्रामपंचायतींची निवडणूक गेल्या मार्च महिन्यांतच होणार होती. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या लॉकडाउनमुळे निवडणुका लांबणीवर पडल्या. ऑगस्ट ते सप्टेंबर व ऑक्‍टोबर ते डिसेंबर यादरम्यान ग्रामपंचातींची मुदत संपुष्टात आली. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने निवडणूक आयोगाने निवडणुकीला स्थगिती दिली होती. आता, सर्वच व्यवहार जवळपास सुरू झालेले आहेत. 

अशापरिस्थितीत ग्रामपंचायतींच्या निवडणुकासुद्धा घेण्याचे संकेत आयोगाने दिलेले होते. त्यानुसार निवडणूक विभागाकडून नियोजन मागविण्यात आलेले होते. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

निवडणुकीची नोटीस तहसीलस्तरावर मंगळवारी (ता.15) प्रसिद्घ होणार आहे. येत्या 23 ते 30 डिसेंबरदरम्यान नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 31 डिसेंबर रोजी होईल. चार जानेवारीला नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार असून, त्याचदिवशी निवडणूक चिन्ह नेमून देणे व उमेदवारांची अंतिमयादी प्रसिद्घ केली जाणार आहे. मतदान येत्या शुक्रवार 15 जानेवारीला होणार आहे. त्यामुळे चार ते 14 जानेवारी अशा 11 दिवसांचा कालावधी प्रचारासाठी मिळणार आहे. परिणामी आतापासून इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. एकाच टप्प्यात जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात रणधुमाळी होणार आहे.

तयारीला आला वेग

ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याच्यादृष्टीने प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांपासून तयारी सुरू केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्हिएम मशीन तपासून घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणसुद्धा झाले आहे. प्रशासन तयार असून, उमेदवारदेखील गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झालेले आहेत. त्यामुळे प्रशासन व इच्छुक अशा दोन्हींमध्ये तयारीला वेग आलेला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com