दोन अपत्यांना सोडून महिलेचे पलायन

संतोष ताकपिरे
Saturday, 12 September 2020

प्रेमात आंधळी झालेल्या महिलेने पती किंवा मुलाबाळाचा विचार केलाच नाही. अनेकदा समजूत काढण्याचा प्रयत्नही व्यर्थ गेला. अखेर पतीने आत्महत्या केली. नीलेश सोबत असलेल्या अनैतिक सबंधाला कंटाळून वडिलांनी आत्महत्या केली. असा आरोपी चक्क मुलीनेच तक्रारीत केला आहे.

अमरावती : अठरा वर्षांची मुलगी, पंधरा वर्षांचा मुलगा असे दोन अपत्य असताना एक ४० वर्षीय विवाहिता तरुणासोबत पळून गेल्यामुळे चिंताग्रस्त पतीने आत्महत्या केली. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून आईसह तिच्या ३२ वर्षीय प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश चौधरी (वय ३१, रा. भुसावळ) व ती ४० वर्षीय महिला अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. शुक्रवारी (ता. ११) हा गुन्हा दाखल झाला. महत्वाची बाब म्हणजे जन्म देणाऱ्या आईवर मुलीने तक्रारीत असा गंभीर आरोप केला आहे.

अधिक माहितीसाठी - Video : जो सन्मान नेत्यांना मिळतो तो तुकाराम मुंढेंना मिळाला, असे क्विचतच घडते

आईचे प्रियकरासोबत असलेल्या संबंधाला कंटाळल्यामुळेच वडिलांनी २९ ऑगस्ट रोजी कोंडेश्वर जंगलात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली होती.

सोशल मीडियावरून शहरातील बडनेरा परिसरातील या महिलेची भुसावळ येथील नीलेशसोबत ओळख झाली. ओळखीनंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. आपल्याला वयात आलेली एक मुलगी आणि तरुण मुलगा आहे याचा तिला विसर पडला असावा. युवकाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या विवाहितेने पतीसह दोन मुलांच्या भविष्याचा विचार न करता १३ मे २०२० रोजीच आपले घर सोडले.

हेही वाचा - वीज ग्राहकांनो लक्ष द्या! अचूक वीजबिल हवंय? मग ५ दिवसांच्या आत हे कराच.. अन्यथा..

नीलेश सोबत ही विवाहिता पुणे येथे निघून गेली. तिने आपण कधीही परत येणार नाही. नीलेशच आपले सर्वस्व असल्याचा निरोप मुलांना व पतीला फोन करून दिला. घटनेनंतर मानसिक धक्का बसलेल्या महिलेच्या पतीने व मुलांनी निघून गेलेल्या आईची समजूत काढण्याचा बराच प्रयत्न केला.

परंतु, प्रेमात आंधळी झालेल्या महिलेने पती किंवा मुलाबाळाचा विचार केलाच नाही. अनेकदा समजूत काढण्याचा प्रयत्नही व्यर्थ गेला. अखेर पतीने आत्महत्या केली. नीलेश सोबत असलेल्या अनैतिक सबंधाला कंटाळून वडिलांनी आत्महत्या केली. असा आरोपी चक्क मुलीनेच तक्रारीत केला आहे.

क्लिक करा - मित्राचे काकूशी अनैतिक संबंध; रंगेहात पकडल्याने केला खून

मुलीच्या शपथेचीही किंमत कळली नाही

ज्या मुलीला जन्म दिला तिनेही शेवटच्या क्षणापर्यंत आईची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तिने परत यावे आपल्यावर पूर्वीप्रमाणेच प्रेम करावे म्हणून मुलीने स्वत: नोकरी करून आपण आजीकडे जाऊन राहू या शब्दात आईची समजूत काढली. तिने परत यावे म्हणून शपथ दिली. परंतु, मुलीच्या शपथेची किंमत तिला कळली नाही.

व्यथा गंभीर
मुलीच्या तक्रारीवरून तिला झालेली व्यथा गंभीर स्वरूपाची वाटते. त्यामुळे तत्काळ गुन्हा दखल करून पोलिसांनी कारवाई केली.
- पंजाब वंजारी,
पोलिस निरीक्षक, बडनेरा ठाणे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leaving children in Amravati, the Mother escaped with her boyfriend