Leopard Attack : बिबट्याने दोन शेळ्या केल्या फस्त; फत्तेपूर येथील घटना, शेतकऱ्यांमध्ये भीती
Wildlife : फत्तेपूर जावरा येथील शेळ्यांच्या गोठ्यात बिबट्याने हल्ला करून दोन शेळ्या ठार केल्या. या हल्ल्यात शेतकऱ्यांचे पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
तिवसा : तालुक्यातील फत्तेपूर जावरा येथे बुधवारी(ता.दोन) रात्रीदरम्यान गावानजीक असलेल्या शेळ्यांच्या गोठ्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या. यामध्ये शेतकऱ्यांचे जवळपास पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले.