लिंगा गाव झाले शांत, शवविच्छेदन अहवालासाठी प्रतीक्षा

चंद्रकांत श्रीखंडे
बुधवार, 11 डिसेंबर 2019

कळमेश्‍वरचे ठाणेदार मारुती मुळीक यांनी या प्रकरणी फार बोलण्यास नकार दिला. तहसील कार्यालय सोमवारी शांत होते. आज एकही संघटना किंवा व्यक्ती निवेदन देण्यासाठी आले नाहीत, अशी माहिती तहसीलदार सचिन यादव यांनी दिली. आज जिल्ह्यात विविध ठिकाणी पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलने झाली. दरम्यान, लिंगा गावात तणावपूर्ण शांतता आहे.

कळमेश्‍वर (जि. नागपूर) : तालुक्‍यातील लिंगा येथील अमानवीय घटनेतील पीडित पाचवर्षीय चिमुकलीचा शवविच्छेदन अहवाल सात दिवसांनंतर प्राप्त होणार आहे. पोलिसांनी तत्परतेने शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल प्राप्त करून त्यानुसार आरोपी संजय देवराव पुरी (वय 30) याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

लिंगा येथे पाच वर्षाच्या चिमुकलीवर अतिप्रसंग व तिचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना रविवारी उघडकीस आली होती. या प्रकरणात लिंगाचे पोलिस पाटील शंकर झाडे व पंचनामा करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी अचूक ताळमेळ जुळवत आरोपी संजय पुरी याला तत्काळ अटक केली होती. आरोपी संजय पुरीने गुन्हा मान्य केला. अतिप्रसंग झाल्याचा प्राथमिक अहवाल मिळाल्यावर हे प्रकरण पोलिसांसाठी अधिक मजबूत झाले. त्याआधारे पोलिसांनी पोस्को, लैंगिक अत्याचार, ऍट्रॉसिटी व खून यांसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

असे का घडले? - निराशा पदरी पडली अन्‌ युवतीने उचलले हे पाऊल

कळमेश्‍वरचे ठाणेदार मारुती मुळीक यांनी या प्रकरणी फार बोलण्यास नकार दिला. तहसील कार्यालय सोमवारी शांत होते. आज एकही संघटना किंवा व्यक्ती निवेदन देण्यासाठी आले नाहीत, अशी माहिती तहसीलदार सचिन यादव यांनी दिली. आज जिल्ह्यात विविध ठिकाणी पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलने झाली. दरम्यान, लिंगा गावात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे. मंगळवारी गावात कामे सुरू झाली असली तरी नागरिकांच्या मनात या घटनेची सल कायम आहे.

पोलिस पाटलांची भूमिका महत्त्वाची
लिंगा येथील पोलिस पाटील शंकर झाडे यांच्याकडून परप्रांतीय कामगारांच्या बाबतीत माहिती घेतली असता ते म्हणाले की, लिंगा गावात परप्रांतीयांची एकूण 50 कुटुंबे असून त्यांची संख्या दीडशे आहे. या सर्व लोकांची माहिती व त्यांचे वैयक्तिक रेकॉर्ड ठेवल्याची माहिती दिली. ग्रामपंचायतीनेदेखील माहिती ठेवावी, असेही ते म्हणाले.

अशा घटनांना आळा घातला जाईल
लिंगाचे पोलिस पाटील शंकर झाडे यांनी या प्रकरणात केलेली कामगिरी अभिनंदनीय आहे. अशीच माहिती ग्रामीण भागातील पोलिस पाटलांनी ठेवावी. जेणेकरून बाहेरून येणाऱ्या व्यक्तींवर व त्यांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवता येतील व अशा घटनांना आळा घातला जाईल.
- दीपक पालिवाल, अध्यक्ष, विदर्भ पोलिस पाटील कल्याणकारी संघटना

14 वर्षांपूर्वीचे प्रकरण पुन्हा चर्चेत
तालुक्‍यातील लोणारा येथे 14 वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. यातील आरोपी कामानिमित्त या भागात आलेले परप्रांतीय होते. लिंगा येथील घटनेतही तसेच साम्य आहे. यामुळे औद्योगिक वसाहतीच्या परिसरात बाहेरून अथवा परप्रांतातून आलेल्या किंवा व्यक्तींची नोंद ठेवण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख वंदना लोणकर यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Linga village becomes quiet, waiting for postmortam report