व्हाट्सॲपवर धडकला असा संदेश; मग शिक्षकांनीच केली नियमांची पायमल्ली

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 April 2020

व्हट्सअॅप संदेश मंगळवारी संध्याकाळी संबधित केंद्रप्रमुखांमार्फत मुख्याध्यापकांना गेला. माहे एप्रिल-2020 ची शालार्थ प्रणाली देयके तयार आहेत. बुधवारी (ता.29) सकाळी पंचायत समिती कार्यालयात उपस्थित रहा, आपल्या संबंधित बीट लिपिकामार्फत देयके प्राप्त करून घ्या, या आशयाचे तंतोतंत पालन करत सकाळी तालुक्यातील 60 ते 70 मुख्याध्यापक पंचायत समितीत धडकले.

मूर्तिजापूर (जि. अकोला)  : ‘वेतन देयकावर स्वाक्षरी करायला पंचायत समितीत हजर रहा’, अशा बीईओंच्या संदेशाचे पालन करणाऱ्या पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांच्या मुख्याध्यापकांची बुधवारी (ता.29) सकाळी येथील पंचायत समिती कार्यालयावर एकच झुंबड उडाल्याने लॉकडाउनचा पार फज्जा उडाला. तालुक्यातील पंचायत समितीच्या शिक्षकांची वेतन देयके पंचायत समितीच्या शिक्षण विभागात तयार करवून घेतली जातात.

क्लिक करा- काय म्हणता, चक्क सावली होणार गायब

व्हाट्सॲपवर धडकला संदेश
देयकांवर डीडीओ-1 म्हणून संबंधित शाळेचा मुख्याध्यापक व डीडीओ-2 म्हणून गट शिक्षणाधिकाऱ्यांची स्वाक्षरी असते. देयक तयार होऊन मिळताच संबंधित लिपीक गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्याध्यापकांना संदेश देऊन पंचायत समितीत स्वाक्षरीसाठी बोलावतात. असाच व्हॉट्सॲप संदेश मंगळवारी संध्याकाळी संबधित केंद्रप्रमुखांमार्फत मुख्याध्यापकांना गेला. माहे एप्रिल-2020 ची शालार्थ प्रणाली देयके तयार आहेत. बुधवारी (ता.29) सकाळी पंचायत समिती कार्यालयात उपस्थित रहा, आपल्या संबंधित बीट लिपिकामार्फत देयके प्राप्त करून घ्या, या आशयाचे तंतोतंत पालन करत सकाळी तालुक्यातील 60 ते 70 मुख्याध्यापक पंचायत समितीत धडकले.

हेही वाचा- धक्कादायक ः वाळू माफियाचा प्रताप; पोलिस कर्मचाऱ्याला टिप्परखाली चिरडले

अनेक संदेश झाले होते प्राप्त
कोरोना विरोधी लढ्याच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाउनचे पालन न करता, सोशल डिस्टन्सिंग न राखता मुख्याध्यापकांची एकच झुंबड उडाली व पंचायत समिती प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लागले. विशेष म्हणजे याच संदेशापूर्वी एक संदेश सर्वांना व्हॉट्सॲप वरून पाठविण्यात आला होता. त्यात टाय, बुट, बेल्ट योजनेच्या पावत्या व विद्यार्थ्यांची यादीसह केंद्रांची संकलित माहिती लॉकडाउनच्या नियमांचे पालन करून, सोशल डिस्टन्सिंग राखून बीआरसीत सादर करा. असे बीईओंच्या या संदेशात नमुद होते.

सूचना दिल्या होत्या
कार्यालयीन कामासाठी जिल्हा परिषदेत आहे. केंद्रप्रमुखांना दिलेल्या संदेशात लॉकडाउनचे नियम पाळा, सोशल डिस्टन्सिंग राखा, अशा स्पष्ट सूचना नमुद केल्या आहेत.
-स्मीता धावडे (परोपटे), गटशिक्षणाधिकारी, पं.स.मूर्तिजापूर

एसीडीओंनी बजावली नोटीस
साथरोग प्रतिबंधात्मक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याबद्दल आपणाविरुद्ध कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत खुलाशासह आपले म्हणणे कार्यालयास 24 तासांच्या आत व्यक्तीशः सादर करा, अन्यथा आपल्या विरुद्ध पुढील कारवाई करण्यात येईल. अशी नोटीस उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी गट विकास अधिकारी अगर्ते यांना बजावली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown in Murtijapur Panchayat Samiti Fuss