अखेर ‘पणन’ला कापूस खरेदीचा सापडला मुहूर्त; राज्यभरात आजपासून संकलन 

चेतन देशमुख 
Friday, 27 November 2020

राज्यभरात आठ दिवसांपासूनच सीसीआयची कापूस खरेदी सुरू झाली आहे. पणनचे केंद्र दिवाळीपूर्वी सुरू होण्याची शक्‍यता होती. यासाठी दोन तारखांची चर्चाही होती. मात्र, खरेदी केंद्र उघडले नाहीत. अखेर पणन महासंघाला शुक्रवारचा (ता.२७) मुहूर्त सापडला आहे.

यवतमाळ : कापूस खरेदीसाठी पणन महासंघाने दोन तारखा आधी जाहीर केल्या होत्या. हे दोन्ही मुहूर्त हुकल्यानंतर अखरे पणन महासंघाला तिसरा मुहूर्त सापडला आहे. उद्या, शुक्रवारी पणन महासंघ राज्यभरातील ३० कापूस संकलन केंद्र सुरू करणार आहे. ‘सीसीआय’ने यापूर्वीच आपले केंद्र सुरू करून कापूस खरेदीला सुरुवात केली आहे. 

अमरावती विभाग हे प्रमुख कापूस उत्पादक प्रदेशात येते. गेल्या हंगामातही मोठ्या प्रमाणात पणन व सीसीआयच्या केंद्रांवर कापसाची खरेदी झाली. नागपूर विभागातही मोठ्या प्रमाणात कापूस पीक घेतले जात आहे. पुरामुळे नागपूर विभागातील कपाशीला काही प्रमाणात फटका बसला. अशातच पावसाचे संकट आले. यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात परतीच्या पावसाने कापसाचे मोठे नुकसान झाले. गेल्या हंगामात झालेली धावपळ पाहता यंदा पणनने केंद्र अर्ध्यावर आणले आहे. 

अखेर स्थानिक कामगार कामावर परतले; परप्रांतीय माथाडी कामगारांना समितीबाहेर काढण्याचे दिले आश्वासन
 

राज्यभरात आठ दिवसांपासूनच सीसीआयची कापूस खरेदी सुरू झाली आहे. पणनचे केंद्र दिवाळीपूर्वी सुरू होण्याची शक्‍यता होती. यासाठी दोन तारखांची चर्चाही होती. मात्र, खरेदी केंद्र उघडले नाहीत. अखेर पणन महासंघाला शुक्रवारचा (ता.२७) मुहूर्त सापडला आहे. यंदा आधीच संचालक मंडळाने राज्यात ३० केंद्रे उघडण्याचा ठराव घेतला होता. तसे पत्र शासनाला दिले होते. परिणामी यंदा राज्यभरात ३० केंद्रांवरच पणन महासंघाची कापूस खरेदी होणार आहे. 

 

२०२१ च्या जनगणनेत ओबीसींचा कॉलम हवा, अन्यथा सहभागी होणार नाही; ओबीसींचा इशारा

 

विभागनिहाय केंद्रांची नावे 

नागपूर : पूलगाव, कारंजा- आष्टी- तळेगाव, काटोल, सावनेर. 
वणी : वरोरा-चिमूर, मारेगाव. 
यवतमाळ : यवतमाळ, कळंब, आर्णी. 
अकोला : बोरगाव मंजू-कानिशिवणी, कारंजालाड. 
अमरावती : अमरावती, वरुड, दर्यापूर, मोर्शी. 
खामगाव : जळगाव जामोद-शेंगाव, देऊळगाव राजा. 
औरंगाबाद : बालानगर, सिल्लोड-खामगावफाटा, शेवगाव-कर्जत. 
परभणी : गंगाखेड, पाथरी-मानवत. 
परळी वैज : धारूर, केज, माजलगाव. 
नांदेड : भोकर, तामसा. 
जळगाव : पारोळा, मालेगाव, धरणगाव-कासोदा. 

यंदा पणन महासंघ ३० केंद्रांवरच कापूस खरेदी करणार आहे. मनुष्यबळ नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांची अडचण होऊ नये, शेतकऱ्यांच्या कापसाला हमीभावपेक्षा कमी दर मिळू नये याकरिता उद्या, शुक्रवारपासून राज्यभरात केंद्र सुरू होणार आहेत. 
- अनंतराव देशमुख, 
अध्यक्ष, राज्य कापूस पणन महासंघ.

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Maharashtra cotton Fedration is going to start cotton Purchase from Friday