esakal | क्षुल्लक कारणावरून झाला वाद आणि स्वागत समारंभाच्या मंडपात घडला थरार; शस्त्रांनी झाले वार 
sakal

बोलून बातमी शोधा

man attacked on young person in wedding reception at Amravati

शेख इरफान हा त्याचा चुलतभाऊ शेख अब्बास शेख हुसेन यांच्या लग्नसमारंभासाठी घुईखेड येथे गेला होता. 1 एप्रिल रोजी लग्न झाले. त्यानंतर 2 एप्रिल रोजी सायंकाळी घरासमोर मंडपात स्वागत समारंभ होता.

क्षुल्लक कारणावरून झाला वाद आणि स्वागत समारंभाच्या मंडपात घडला थरार; शस्त्रांनी झाले वार 

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती ः तळेगाव दशसर हद्दीत घुईखेड येथे लग्नाच्या स्वागत समारंभाच्या मंडपात युवकासोबत क्षुल्लक कारणावरून वाद झाला, त्यावरून प्राणघातक हल्ला करून हत्या करण्याचा प्रयत्न झाला..

मिनी लॉकडाउन जाहीर होताच तळीरामांची दारूच्या दुकानात गर्दी, तर निर्बंधांमुळे व्यापारी...

शेख इरफान शेख रमजान (वय 23, रा. ट्रान्स्पोर्टनगर) असे हल्ल्यातील गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. जखमीच्या तक्रारीवरून तळेगाव दशासर पोलिसांनी संशयित आरोपी साहिल उर्फ शेख तौफिक शेख मुश्‍ताक खान (वय 23, रा. ताजनगर) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शनिवारी (ता. तीन) रात्री गुन्हा दाखल केला. त्यानंतर काही तासात पोलिसांनी साहिल यास अटक केली. 

शेख इरफान हा त्याचा चुलतभाऊ शेख अब्बास शेख हुसेन यांच्या लग्नसमारंभासाठी घुईखेड येथे गेला होता. 1 एप्रिल रोजी लग्न झाले. त्यानंतर 2 एप्रिल रोजी सायंकाळी घरासमोर मंडपात स्वागत समारंभ होता. त्याचवेळी साहिल हा त्याच्या पत्नीसोबत मंडपातच वाद घालीत होता. त्यामुळे शेख इरफान यांनी हटकले असता, चिडून साहिलने शेख इरफानसोबत वाद घातला. त्याला शिवीगाळ केली. जवळ असलेल्या चाकूने वार करून हत्येचा प्रयत्न केला. 

पुण्यावरून कधी येणार कोविड लसीचा साठा? गोंदियात तुटवडा...

जखमी शेख इरफान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी साहिल उर्फ शेख तौफिक विरुद्ध गुन्हा दाखल केला. हल्ल्याच्या घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बिरांजे, संदेश चव्हाण, अमर काळे, अंकुश पाटील यांच्या पथकाने संशयित आरोपी साहिल मुख्ताक खान यास चांदुररेल्वे येथून शनिवारी (ता. तीन) रात्री अटक केली.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image