चंद्रपूरच्या त्या वीराने गोवामुक्तीसाठी दिली होती प्राणांची आहुती..कोण होते शहीद बाबुराव थोरात.. वाचा गोवामुक्ती लढ्याची संपूर्ण माहिती

man in chandrapur had given his life for independence of goa
man in chandrapur had given his life for independence of goa

चंद्रपूर : 3 ऑगस्ट 2020 प्रमाणेच 3 ऑगस्ट 1956 रोजी सुध्दा रक्षा बंधनाचा सण होता. याच दिवशी चंद्रपूर शहरातील एक युवक बाबुराव केशवराव थोरात यांनी गोवा स्वातंत्र्य संग्रामात प्राणांची आहुती दिली. 'गोवा मुक्ती' चा लढा अनेक वर्षे सुरू होता व अनेकांनी त्यासाठी बलिदान केले.

आज जन विकास सेने तर्फे आझाद बगिचा येथे राखी अर्पण करून त्यांना अभिवादन  करण्यात आले.  यावेळी त्यांचे पुत्र श्री.विजय बाबुराव थोरात, सुन व श्री.गोपालभाऊ अमृतकर आणि काॅम्रेड नामदेव कन्नाके उपस्थित होते. 450 पेक्षा जास्त वर्षे गोवा पोर्तुगिजच्या अधिपत्याखाली होते. 19 डिसेंबर 1961 रोजी भारत सरकारने सैन्यबळाचा वापर करून गोव्याला भारतात विलिन करून घेतले.

गोव्याला स्वातंत्र्य उशीरा का?

भारतावर ब्रिटिशांचं तर गोवा आणि दमण-दीववर पोर्तुगीजांची सत्ता होती. 15 ऑगस्ट 1947 ला भारतातून ब्रिटिशांची सत्ता गेली. नंतरच्या काळात काश्मीरपासून हैदराबाद अशी संस्थानेही भारतात सामील झाली. पण गोवामुक्ती रखडली.  पंतप्रधान जवाहरलाल नेहरू गोव्यातील पोर्तुगीजांच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यास अनुकूल नव्हते. मात्र गोमंतकीय जनता अत्यंत्य हाल अपेष्टांमध्ये जगत होती. जनमानसात रोष होता.

शहीद बाबुराव थोरात यांचा सहभाग
 
गोवा मुक्ती संग्रामात महाराष्ट्राने मोलाची साथ दिली हे त्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांवरूनच दिसून येतं. शिवाय यात विविध विचारांच्या व्यक्ती एकत्र आल्या होत्या.उजव्या-डाव्या, समाजवादी अशा विविध विचारधारांमधील अनेक कार्यकर्ते गोव्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, या एकमताने एकत्र येऊन लढा देत होते. यात होते ते चंद्रपूरचे बाबुराव थोरात. बाबुराव थोरात यांनी गोवामुक्ती संग्रमात लढा देऊन अखेर रक्षा बंधनाच्या  दिवशी आपल्या प्राणांची आहुती दिली.  

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com