स्वत:ला भारताचा पंतप्रधान घोषित केलं, गुन्हा दाखल होताच फरार; पोलिसांनी फॉर्च्युनर केली जप्त

Mahadev Asekar : भारताचे पंतप्रधान म्हणून घोषित करणाऱ्या महादेव गुलाब आसेकर याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याची गाडी जप्त करण्यात आलीय. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
Police Seize SUV After Man Claims To Be Indias PM

Police Seize SUV After Man Claims To Be Indias PM

Esakal

Updated on

सकाळ वृत्तसेवा, वरोरा, ता. १ : स्वतःला भारताचे पंतप्रधान म्हणून घोषित करणाऱ्या महादेव गुलाब आसेकर या व्यक्तीवर वरोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने आपल्या फोरच्युनर वाहनावर 'पीएम' आणि 'पंतप्रधान भारत सरकार' असे स्टीकर लावले होते. या वाहनाने २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास शहरातील रत्नमाला चौकात वाहतूक नियंत्रण बॅरिकेड तोडून पलायन केल्याची घटना घडली. सध्या तो फरार असून, पोलिसांनी त्याचे वाहन जप्त केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com