esakal | पोलिस ठाण्यात केली दरोड्याची तक्रार, नंतर समोर आले धक्कादायक वास्तव
sakal

बोलून बातमी शोधा

man give false complaint of robbery in wardha

तक्रारदाराने गळ्याला चाकू लावून चोरट्यांनी 4 लाख 50 हजार रुपये रोख एक लाख 11 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण 5 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार पोलिसात केली.

पोलिस ठाण्यात केली दरोड्याची तक्रार, नंतर समोर आले धक्कादायक वास्तव

sakal_logo
By
रूपेश खैरी

वर्धा : कर्जामुळे हतबल झालेल्या मांडगाव येथील महादेव यादव पिसे या तक्रारदाराने स्वत:च दरोड्याचा बनाव केल्याच उघड झाले. पोलिसांनी केलेल्या तपासात तक्रारदाराने त्याच्याकडील सर्वच दागिने सोनाराकडे गहाण ठेवल्याचे कबूल केले. यावरून महादेव पिसे यांच्यावर खोटी तक्रार नोंदविल्याची नोंद पोलिसात करण्यात आली.   

हेही वाचा - एकाचवेळी पाच बालकांना हातात घेऊन शूर परिचारिकेची आगीतून धाव, मेयोमधील घटनेची अनेकांना आठवण

मांडगाव येथे शुक्रवारच्या मध्यरात्री चाकूच्या धाकावर दरोडा झाल्याचा गुन्हा हिंगणघाट पोलिसात दाखल करण्यात आला. यात तक्रारदाराने गळ्याला चाकू लावून चोरट्यांनी 4 लाख 50 हजार रुपये रोख एक लाख 11 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण 5 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार पोलिसात केली. यावरून पोलिसांनी तपास सुरू केला असता बयाणात असलेल्या तफावतीवरून रचलेला दरोड्याचा बनाव उघड झाला. 

ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशाप्रमाणे सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र इंगळे, सलाम कुरेशी, गजानन लामसे, यशवंत गोल्हर, राजेंद्र जयसिंगपुरे, मनीष कांबळे, अभिजीत वाघमारे, गोपाल बावनकर, नवनाथ मुंडे यांनी केली. 

हेही वाचा - भंडारा रुग्णालय आग प्रकरण : आऊट बॉर्न युनिटबद्दल समोर आली धक्कादायक माहिती

कर्जामुळे रचले नाट्य - 
या गुन्ह्यातील तक्रारदाराला सखोल विचारपूस केली असता गुन्ह्यातील चोरी गेलेले दागिने हे सोनाराकडे गहाण ठेवले असून कुठलीही चोरी झाली नसल्याचे कबूल केले. त्यांच्यावर झालेल्या कर्जापोटी ही खोटी तक्रार दिल्याचे कबूल केले. यावरून महादेव पिसेला हिगणघाट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

loading image