esakal | चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार; स्वतः फोन करून मागितली मदत
sakal

बोलून बातमी शोधा

वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार; स्वतः फोन करून मागितली मदत

वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार; स्वतः फोन करून मागितली मदत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागभीड (जि. चंद्रपूर) : जंगलात जनावरे चारण्यासाठी घेऊन गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला (tiger attack) करून ठार केले. ही घटना मंगळवारी (ता. ६) दुपारी दीड वाजताच्या सुमारास (Man-killed) घडली. रमेश जयराम वाघाडे (वय ४२) असे मृताचे नाव आहे. मृताच्या पत्नीला तातडीने २० हजार रुपयांची मदत देण्यात आली. (Man-killed-in-tiger-attack-in-Chandrapur)

तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या आलेवाही बिटातील कक्ष क्रमांक ७०३ परिसरात मंगळवारी रमेश वाघाडे हा जनावरांना चारण्यासाठी आला होता. दुपारी झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने रमेशवर हल्ला चढविला. यात तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याने गावात फोन करून मदत मागितली. गावकऱ्यांनी याची माहिती वनविभागाला दिली.

हेही वाचा: १२ वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराने लग्न करताच प्रेयसीची आत्महत्या

आलेवाही बिटातील वनरक्षक पी. एम. गायकवाड आणि त्यांची चमू घटनास्थळी उशिराने पोहोचली. चमू आल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला वाढोणा येथील प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात आणण्यात आले. मात्र, डॅाक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, वनविभागाने घटनास्थळाच्या परिसरात कॅमेरे लावले आहेत. मृताच्या पत्नीला तातडीने २० हजार रुपयांची मदत देण्यात आली. यावेळी क्षेत्र सहायक के. डी. गरमडे, वनरक्षक एस. एस. गौरकर, वनरक्षक यू. वी. कराडे, पी. एम. गायकवाड, एस. बी. चौधरी, एस. बी. पेंदाम, कुळमेथे यांची उपस्थिती होती.

(Man-killed-in-tiger-attack-in-Chandrapur)

loading image