तिवसा तालुक्यात १२ वर्षीय मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल

सदर मुलीला एका गावात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करून तिचा लैगिंक छळ करण्यात आलेला आहे. विठ्ठल रामजी कामठे वय ४५वर्ष असे आरोपीचे नाव आहे, सदर घटनेची तक्रार मुलीच्या आईने तिवसा पोलिस ठाण्यात दिली आहे.
सदर मुलीला एका गावात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करून तिचा लैगिंक छळ करण्यात आलेला आहे. विठ्ठल रामजी कामठे वय ४५वर्ष असे आरोपीचे नाव आहे, सदर घटनेची तक्रार मुलीच्या आईने तिवसा पोलिस ठाण्यात दिली आहे.

तिवसा (जि. अमरावती) :  तिवसा तालुक्यातील एका १२ वर्षीय मुलीवर एका ४५वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना तिवसा पोलीस ठाण्याअंतर्गत उघडकिस आली आहे, या मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या मागावर पोलिस आहेत.

सदर मुलीला एका गावात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करून तिचा लैगिंक छळ करण्यात आलेला आहे. विठ्ठल रामजी कामठे वय ४५वर्ष असे आरोपीचे नाव आहे, सदर घटनेची तक्रार मुलीच्या आईने तिवसा पोलिस ठाण्यात दिली आहे. मुलगी ही 7व्या वर्गात शिक्षण घेत आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून तिवसा पोलिसांनी कलम३७६,(३),सह कलम४,६,पोस्को सह अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे  या घटनेने तिवसा तालुक्यात खळबळ उडाली असून तिवसा पोलीस आरोपीच्या मार्गावर आहेत.

काही महिन्या आधी आरोपी यांच्या पत्नीचे सापदौंशमुळे निधन झाले होते, तेव्हापासून आरोपी अवैध दारूचा  व्यवसाय करत होता तर आरोपीची पार्शभूमी गुन्हेगाराची असून त्यावर अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई सुद्धा केली होती, 

यातील पीडित मुलीच्या घरी आरोपीचे जाणे,येणे होते.मात्र आज मुलीला दुचाकीवर  बाहेर घेऊन गेल्याने घरच्यां लोकांनी मुलीचा शोध घेतला असता ती दिसून आली नाही त्यामुळे हा सर्व प्रकार उशीरा उघडकीस आला.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com