esakal | टॅक्सीच्या दाराला धडकून पडला रस्त्यावर अन् मागून आली बस; घडली अंगावर शहारे आणणारी घटना 
sakal

बोलून बातमी शोधा

man is no more in accident near varora Chandrapur

रोहन उर्फ जाकी अशोक माटे हा एम एच 34 एफ 32 76 या क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने बोर्डा चौकात विरुद्ध दिशेने येत होता. रस्त्यातच एम एच 34-2518 या क्रमांकाच्या काळी पिवळी चालकाने अचानक दरवाजा उघडला. 

टॅक्सीच्या दाराला धडकून पडला रस्त्यावर अन् मागून आली बस; घडली अंगावर शहारे आणणारी घटना 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वरोरा (जि. चंद्रपूर) ः दुचाकीने एक युवक विरुद्ध दिशेने येत होता. अचानक काळी पिवळी टॅक्‍सी चालकाने दार उघडले. त्या दाराला दुचाकीस्वार धडकून रस्त्यावर पडला. त्यानंतर मागून येणाऱ्या एसटीच्या मागील चाकात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना रविवारी (ता. 28) नागपूर- चंद्रपूर मार्गावरील बोर्डा चौकात घडली.

हेही वाचा - ज्या बहिणीला दिलं होतं रक्षणाचं वचन तिच्यावरच केले चाकूनं वार; सख्ख्या भावानं केली अमानुष हत्या 

रोहन उर्फ जाकी अशोक माटे हा एम एच 34 एफ 32 76 या क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने बोर्डा चौकात विरुद्ध दिशेने येत होता. रस्त्यातच एम एच 34-2518 या क्रमांकाच्या काळी पिवळी चालकाने अचानक दरवाजा उघडला. 

त्यात दुचाकीस्वार धडकून खाली पडला. त्यामागून एम एच 40 ए क्‍यू 6420 या क्रमांकाची नागपूर आगाराची एसटी बस येत होती. याच बसच्या मागील चाकात सापडून रोहन अशोक माटे याचा मृत्यू झाला. 

नक्की वाचा - मेळघाटच्या निसर्गसंपन्नतेवर नक्की कोणाची वक्रदृष्टी? होतंय अवैध उत्खनन; महसूल प्रशासनाचं दुर्लक्ष

वरोरा पोलिसांनी एसटी बस पोलिस स्टेशनमध्ये जमा केली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या काळी पिवळी टॅक्‍सीचा पोलिस शोध घेत आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image