Maoist leader Bhupati to surrender before CM FadnavisMaoist leader Bhupati to surrender before CM Fadnavis
esakal
Senior Maoist leader Mallojula Venugopal alias Bhupati to surrender before Maharashtra CM Devendra Fadnavis : मागील काही वर्षांपासून जराजर्जर झालेल्या माओवादी चळवळीला त्यांच्या इतिहासातील सर्वांत मोठा धक्का बसला आहे. दीर्घकाळ माओवादी चळवळीत सक्रिय राहून पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीपर्यंत पोहोचलेला वरिष्ठ माओवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू आपल्या तब्बल ६० सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर शरणागती पत्करणार आहे. त्याच्यावर विविध राज्यांत मिळून दहा कोटींहून अधिक बक्षीस आहे. गुरुवार (ता. १६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तो शस्त्र खाली ठेवून शरण येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.