खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर वाजले ढोल; मराठा क्रांती मोर्चाचे खासदारांच्या घरासमोर आंदोलन   

सुधीर भारती
Thursday, 24 September 2020

मराठा आरक्षणाला देण्यात आलेली स्थगिती नवीन अध्यादेश काढून रद्द करण्यात यावी, अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने शासनाकडे करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अंबादास काचोळे यांनी केला.

अमरावती - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षण तसेच अन्य विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार नवनीत राणा यांच्या निवासस्थानासमोर आज सकाळी १० वाजता ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. यासोबतच टप्प्याटप्याने जिल्ह्यातील सर्व आमदार तसेच पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर देखील हे आंदोलन करण्यात येणार आहे. 

मराठा आरक्षणाला देण्यात आलेली स्थगिती नवीन अध्यादेश काढून रद्द करण्यात यावी, अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने शासनाकडे करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अंबादास काचोळे यांनी केला.

अंधश्रद्धा फक्त भारतातच नाहीत! या देशांमधील अजब अंधश्रद्धा वाचून तुम्हीही व्हाल थक्क

'या' आहेत मागण्या -

मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळत नाही तोपर्यंत पोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित करण्यात यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी, सारथी संस्थेला 1500 कोटींचा निधी देण्यात यावा, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव आदी मागण्या मराठा समाजाच्या वतीने शासनाकडे करण्यात आल्या आहेत. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी सकाळी 10 वाजता खासदारांच्या निवासस्थानासमोर, तर त्यानंतर आमदारांच्या घरांसमोर ढोल वाजविण्यात आल्याचे काचोळे यांनी सांगितले. 

गेल्या ९ सप्टेंबरला मराठा आरक्षणाला न्यायालयाकडून स्थगिती -

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर गेल्या ९ सप्टेंबरला सुनावणी घेण्यात आली. यावेळी नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण सध्या लागू होणार नाही, असे सांगत न्यायालयाने आरक्षणाच्या अंमलबजावणीला तूर्तास स्थगिती दिली. 

आजारातून बरे झाल्यानंतर जाणवतोय अशक्तपणा? मग हे उपाय करा आणि अशक्तपणा कायमचा घालवा

मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजे आक्रमक - 

मराठा आरक्षणावर खासदार छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. राज्य सरकारने मंगळवारी मराठा आरक्षणाबाबत काही घोषणा केल्या. मात्र, त्या अपुऱ्या असल्याचे खासदार संभाजी राजे म्हणाले. राज्य सरकारने मोठ्या मनाने आर्थिक मदत वाढवून दिली पाहिजे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल त्यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले. मात्र, त्याबाबत पूर्णपणे समाधानी नसल्याचे त्यांनी सांगितले. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

संपादन - भाग्यश्री राऊत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maratha kranti morcha agitation for demand to lift the stay on maratha reservation