esakal | अंधश्रद्धा फक्त भारतातच नाहीत! या देशांमधील अजब अंधश्रद्धा वाचून तुम्हीही व्हाल थक्क
sakal

बोलून बातमी शोधा

what is the Superstition red full story

अंधश्रद्धेमुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. पण, अशा अंधश्रद्धा फक्त भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये आहेत. वाचून विश्वास बसत नाही ना? आज आम्ही तुम्हाला अशाच काही देशांच्या अंधश्रद्धांबद्दल सांगणार आहोत, जाणून घ्या...

अंधश्रद्धा फक्त भारतातच नाहीत! या देशांमधील अजब अंधश्रद्धा वाचून तुम्हीही व्हाल थक्क

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे यास अंधश्रद्धा असे म्हणतात. अंधश्रद्धेमध्ये विविध प्रकार आहेत. यामध्ये काळी जादू, तंत्र-मंत्र, जादूटोणा, नरबळी, नजर टोक, भूत-प्रेत, पिशाच्च. या संबंधित अंधविश्वास, अफवा पसरवणे व कृती करणे तसेच या कृतींचाही इतर प्राणी जीवनावर विपरित परिणाम होणे म्हणजेच अंधश्रद्धा होय.

भारत देशात श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन विषयांवर सतत मतमतांतरे राहिली आहेत. काही विशिष्ट गोष्टी केल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो किंवा देवाचा कोप होऊ शकतो अशा गोष्टी अनेकदा आपल्याला ऐकायला मिळतात. अंधश्रद्धेमुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. पण, अशा अंधश्रद्धा फक्त भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये आहेत. वाचून विश्वास बसत नाही ना? आज आम्ही तुम्हाला अशाच काही देशांच्या अंधश्रद्धांबद्दल सांगणार आहोत, जाणून घ्या...

अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला

या आहेत काही देशांच्या अजब अंधश्रद्धा

 • फ्रान्समध्ये जर आपला डावा पाय श्वानाच्या विष्टेवर पडला तर शुभ समजले जाते. पण, आपला उजवा पाय त्यावर पडला तर दुर्दैव आहे असे मानले जाते.
 • लिथुआनिया येथे घरात बसून शिट्या वाजवणे म्हणजे घरात सैतानांना आमंत्रित करणे आहे, असे समजले जाते.
 • जपानमध्ये दफनभूमीच्या जवळून जाताना लोकं आपला अंगठा बोटांमध्ये लपवतात ज्याने त्यांच्या पालकांचा अकाळी मृत्यू टळतो.
 • जपानमध्ये तांदळाच्या वाटीत चॉपस्टिक्स सरळ ठेवणे वाईट मानले जाते.

हेही वाचा - प्यार दिवाना होता है! टिकटॅकवर झाली ओळख, घेतल्या आणाभाका आणि...

 • इजिप्त येथे नुसती कात्री चालवणे वाईट समजले जातात. येथे कात्रीचे तोंड खुले ठेवण्याने दुर्दैव आडवं येते असे म्हणतात.
 • चीन येथे चार अंक वाईट मानलो जातो. चिनी भाषेत याचे उच्चारण करणे मृत्यूसमान असते.
 • तुर्की येथे रात्री च्युइंग गम खाण्यास मनाई आहे. येथे असे मानले जाते की रात्रीच्या अंधारात ही च्युइंग गम एखाद्या मृत मनुष्याच्या मासात परिवर्तित होते.
 • रशियात आपली कार किंवा स्वत:वर चिमणीची बीट पडणे समृद्धीचे लक्षण मानले जाते.
 • रशियात पिवळे फूल देणे संबंध तोडण्याचे प्रतीक आहे, हे विश्वासघात दर्शवते.
 • स्पेन मध्ये १३ तारखेला मंगळवार आल्यास शुभ मानले जाते.
 • रवांडा येथे स्त्रियांनी शेळीचे मटण खाल्ल्यास त्यांना दाढी मिशा येतील असे म्हणतात.

सविस्तर वाचा - ते लांब बसून रडत होते; काही नागरिक बघून निघून गेले, पडाटे आले सत्य समोर

 • जर्मनीत पाण्याच्या ग्लासाने चीयर्स करणे चुकीचे मानले जाते. याचा अर्थ आपण पाणी पिणाऱ्याची मृत्यू इच्छितो असे मानले जाते.
 • स्वीडन येथे मानले जाते की जर आपण अश्श्या मॅनहोलवर पाय ठेवला ज्यावर के अक्षर लिहिलेलं असेल तर आपण प्रेमात यशस्वी ठराल. परंतु, ए अक्षर असलेल्या मॅनहोलवर पाय ठेवल्याने प्रेमात निराशा हाती येईल.
 • सेनेगल येथे लोकं आपल्या यत्रांबद्दल इतर लोकांशी चर्चा करणे टाळतात. कारण, समोरच्याची दृष्टी सैतानी असू शकते असे ते मानतात.
 • पोर्तुगाल येथे मागच्या बाजूला चालत असाल तर हे सैतानाला रस्ता दाखवण्यासारखे आहे.
 • नेदरलँड्स येथे डायनिंग टेबलावर गाणं गाणे म्हणजे सैतानाला गाणं ऐकवण्यासारखे असल्याचे मानले जाते.

जाणून घ्या - भूषणावह बाब : ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी मेडिकलमध्ये

 • भारतात सूर्य ग्रहणावेळी प्रत्येकाने घरात असले पाहिजे. कारण, तेव्हा विषारी व हानिकारक किरणांपासून वाचणे आवश्यक आहे असे म्हणतात.
 • कोरियात झोपताना पंखा चालवण्याने श्वास घुटमळून आपली मृत्यू होऊ शकते असे मानले जाते.
 • युके येथे अनेक लोकं नवीन जोडे टेबलावर ठेवणे अशुभ मानतात.

संकलन व संपादन - अथर्व महांकाळ

loading image