esakal | बाजारपेठेचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात, लॉकडाउनच्या काळात बाजारपेठा उघडण्याची शक्यता धुसर

बोलून बातमी शोधा

market not open in 8 days of lockdown in amravati}

जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर कारवाईचा इशारा दिल्याने व्यावसायिक प्रतिष्ठाने बंदच राहिली. मात्र, महापालिका आयुक्तांनी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींना त्यांच्या भावना व्यक्त करण्यास व प्रस्ताव देण्याकरिता चर्चेला आमंत्रित केले होते.

बाजारपेठेचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात, लॉकडाउनच्या काळात बाजारपेठा उघडण्याची शक्यता धुसर
sakal_logo
By
क्रिष्णा लोखंडे

अमरावती : लॉकडाउनमधून सूट मिळावी व व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, कोरोनाचे सर्व नियम पाळू, असा प्रस्ताव महानगर चेंबरने महापालिका आयुक्तांना दिला. त्यावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती निर्णय घेणार असल्याचे सांगून महापालिका आयुक्तांनी व्यापारी संघटनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात ढकलला आहे. त्यामुळे येत्या आठ मार्चपर्यंत लॉकडाउनमध्ये बाजारपेठ उघडण्याची शक्‍यता धूसर झाली आहे.
मंगळवारी (ता. दोन) लॉकडाउन मोडून बाजारपेठ उघडण्याची धमकी काही व्यापाऱ्यांनी दिली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर कारवाईचा इशारा दिल्याने व्यावसायिक प्रतिष्ठाने बंदच राहिली. मात्र, महापालिका आयुक्तांनी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींना त्यांच्या भावना व्यक्त करण्यास व प्रस्ताव देण्याकरिता चर्चेला आमंत्रित केले होते.

हेही वाचा - यवतमाळच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीकडून लॉबिंग सुरू? पुसदचा बंगला केंद्रस्थानी;...

चेंबर ऑफ अमरावती महानगर मर्चंट्‌स ऍण्ड इंडस्ट्रीज अमरावतीचे अध्यक्ष सुरेश जैन, उपाध्यक्ष प्रकाश बोके, सचिव घनश्‍याम राठी, कोषाध्यक्ष जयंत कामदार, सुदीप जैन, अशोक मंत्री, महेश पिंजानी, पप्पू गगलानी, सारंग राऊत, विजय भूतडा, राजा चांदवाणी, अशोक राठी बैठकीत उपस्थित होते.

व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी लॉकडाउनमुळे व्यवसाय बुडत असून आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगितले. त्यामुळे सकाळी 10 ते सायंकाळी 5 किंवा सकाळी 11 ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बाजारपेठ उघडी ठेवण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव मनपा आयुक्तांना देण्यात आला.

हेही वाचा - गडकिल्ले आणि हेरिटेजसाठी तरुणाचे सायकलने भारत भ्रमण; १५ राज्यातून करणार ११ हजार...

सद्यस्थितीत महानगरात संक्रमित रुग्णांची वाढती संख्या बघता लॉकडाउन पाळण्यास प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले. यासोबतच व्यापारी संघटनांनी दिलेला प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार असून त्यांचा निर्णय येईस्तोवर बाजारपेठ बंद ठेवण्याचेही आवाहन केले. व्यापारी संघटनांनी केलेल्या सुचनेनुसार चाचणी शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. चेंबरचे अध्यक्ष सुरेश जैन यांनी प्रशासनाने मार्केट उघडण्यास परवानगी दिली तरच दुकाने उघडण्यात येतील, तरी प्रशासनाने सकारात्मकरीत्या व्यापाऱ्यांना न्याय द्यावा, अशी भावना व्यक्त केली.