esakal | खनिकर्म अधिकाऱ्याची रिव्हॉल्व्हर चोरली; होते सहा जिवंत काडतूस; प्रवासादरम्यान घटना
sakal

बोलून बातमी शोधा

Men theft Revolver of Government officer in Amravati

रोशन राजेश्‍वर मेश्राम (वय 50, रा. अलिबाग) हे अलिबाग येथे जिल्हा खनिकर्म अधिकारी आहेत. शनिवारी  मध्यरात्रीनंतर सव्वाबाराच्या सुमारास आदित्यराज ट्रॅव्हल्स जीजे 14 झेड 4 ने कंबोली हायवे, 

खनिकर्म अधिकाऱ्याची रिव्हॉल्व्हर चोरली; होते सहा जिवंत काडतूस; प्रवासादरम्यान घटना

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती  ः प्रवासादरम्यान चोऱ्या होण्याचे प्रकार नवीन नाहीत. परंतु एका खनिकर्म अधिकाऱ्याची रिव्हॉल्व्हर ज्यात सहा जिवंत काडतूस होते ती चोरीस गेले. बडनेरा पोलिसांनी याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध शनिवारी (ता. 15) गुन्हा दाखल केला.

रोशन राजेश्‍वर मेश्राम (वय 50, रा. अलिबाग) हे अलिबाग येथे जिल्हा खनिकर्म अधिकारी आहेत. शनिवारी (ता. 16) मध्यरात्रीनंतर सव्वाबाराच्या सुमारास आदित्यराज ट्रॅव्हल्स जीजे 14 झेड 4 ने कंबोली हायवे, पनवेल येथून नागपूरला जाण्यासाठी निघाले होते. बडनेरा हद्दीत अकोला वाय पॉइंटवर रात्रीला सदर ट्रॅव्हल्स थांबली. 

जाणून घ्या - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार

श्री. मेश्राम यांनी त्यांची ट्रॉली कॅनव्हास बॅग ही आसन क्रमांक सातवर ठेवून ते बसच्या खाली उतरले. त्यामध्ये परवाना असलेले व सहा जिवंत काडतूस भरलेले रिव्हॉल्व्हर होते. शिवाय त्याच बॅगमध्ये बॅंकेचे काही दस्तऐवज, कपडे ठेवले होते. फ्रेश झाल्यानंतर श्री. मेश्राम हे पुन्हा ट्रॅव्हल्समध्ये चढले असता त्यांची बॅक सीटवर दिसली नाही. 

हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यामध्ये दोन अनोळखी व्यक्ती श्री. मेश्राम यांची बॅग घेऊन जाताना दिसले. श्री. मेश्राम यांनी बडनेरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी रिव्हॉल्व्हर व काडतूस चोरीप्रकरणी अज्ञात दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

नक्की वाचा - काळोखात कुत्रासदृश्य प्राणी दिसल्यानं मारली काठी, समोर येताच वाचवा-वाचवा ओरडली

ट्रॅव्हल्समधून चोरीस गेलेली खनिकर्म अधिकाऱ्यांची रिव्हॉल्व्हर ही खासगी होती. त्याप्रकरणी काहींचे बयाण नोंदविले. सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी ताब्यात घेतले.
-पंजाब वंजारी, 
पोलिस निरीक्षक बडनेरा ठाणे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image