लॉकडाऊनच्या काळात या वर्गाचे होताहेत खूप हाल, वाचा ही करुण कहाणी...

Mental torture ration card holders during the lockdown
Mental torture ration card holders during the lockdown

गोंदिया : लॉकडाउनच्या काळात प्रचंड हाल झाले ते शिधापत्रिकाधारक कुटुंबांचे... रेशन दुकानदारांनी अक्षरशः त्यांचा मानसिक छळ केलाय... अशा अनेक घटना गोंदिया जिल्ह्यात समोर आल्या... तक्रारी झाल्या... मात्र, कोरोनाच्या संकटात कोणीच काही बिघडवू शकत नाही... ही प्रशासनात काम करणाऱ्यांची किंबहुना रेशन दुकानदारांची झालेली मानसिकता गोरगरिबांना छळतेय... अजूनही कित्येक लाभार्थी उपाशी आहेत... त्यांना अन्नाची गरज आहे... पण तक्रारी येऊनही प्रशासनाला पाझर फुटत नाही, हे दुर्दैव आहे.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव राज्यभर दिसून येत आहे. दिवसागणिक कुठे ना कुठे बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूची पसरत जाणारी साखळी तोडून काढण्यासाठी सरकारने प्रशासनाला हाताशी धरून प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या. त्या राबविणेदेखील सुरू केले. यातलाच एक भाग म्हणून शिधापत्रिकाधारकांना माफक दरात तर कुठे मोफत रेशन देण्याची योजना आणली. मात्र, दांडीबहाद्दर रेशन दुकानदार अंत्योदय योजनेचे लाभार्थी व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाच्या पत्रकान्वये धान्याचे वाटप करीत नाही.

ऑनलाइन नोंदीनुसार धान्य देत नाही अशा एक नव्हे, शेकडो तक्रारी गोंदिया जिल्ह्यात आल्या. प्रत्यक्षात या बाबी प्रशासनाच्या नजरेसही आणून देण्यात आल्याचे पीडित शिधापत्रिकाधारकांचे म्हणणे आहे. मात्र, प्रशासनाने या गरिबांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर आमचे कोणीच काही बिघडवू शकत नाही. अशीच काहीअंशी मानसिकता रेशन दुकानदार किंबहुना या विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांची आहे. याचाच परिपाक म्हणून आजही बहुतांश गरिबांच्या घरात रेशनचे धान्य पोहोचले नाही.

हे कुटुंब पोटाला चिमटा घेऊन दिवस-रात्र काढत आहेत. रेशन दुकानदारच नव्हे तर, आता जिल्हा प्रशासनही पोटावर मारत असल्याची खंत कित्येक नागरिकांनी व्यक्त केली. त्यामुळे एखादा भूकबळी गेल्यावरच जिल्हा प्रशासनाला जाग येईल का? हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. उल्लेखनीय म्हणजे नवेगावबांध येथे खंडामिश्रित व अळ्यामिश्रित तांदूळ पुरवठा झाल्याचे प्रकरण समोर आले. शिधापत्रिकाधारकांनी या तांदळाची उचल न करता थेट पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.

धरणे आंदोलन करू
शिवनी येथील रेशन दुकानदाराने पावणेतीनशे रेशन कार्डधारकांपैकी दोनशे रेशनकार्डात घोळ केला आहे. खऱ्या गरजूंना रेशन देत नाही. त्यामुळे दुकानदारावर कारवाई व्हावी, याकरिता लवकरच तालुकास्थळी धरणे देऊ.
- संदीप उके, शिवणी, ता. आमगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com