Vidhan Sabha 2019 : मंत्रीच म्हणतात, मोदींच्या सभेला दुचाकीवर पाच-पाचजण बसा, बाकी मी बघतो (व्हिडिओ)

अभिजीत घोरमारे
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतलेली दिसून येत आहे. 13 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. त्या सभेला एका दुचाकीवर पाच-सहा जण बसून या पण नक्की या. तुम्हाला कोण काय अडवतंय ते बघू अशी धमकी गोंदियाचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली आहे.

भंडारा : आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतलेली दिसून येत आहे. 13 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. त्या सभेला एका दुचाकीवर पाच-सहा जण बसून या पण नक्की या. तुम्हाला कोण काय अडवतंय ते बघू अशी धमकी गोंदियाचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली आहे.

दरम्यान, डॉ. परिणय फुके हे साकोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. डॉ. फुके यांच्या भाषणाच्या वेळी त्यांचा बोलण्यावरील ताबा सुटला आणि "एका दुचाकीवर पाच लोक बसवून आणा पण मोदींच्या सभेला या, असे भाजप कार्यकर्त्यांना भर सभेत आवाहन त्यांनी केले आहे. गाडी पकडल्यास पोलिसाना सांगा मी परिणय फुकेचा कार्यकर्ता आहे, तुम्हाला कोणी हातही लावणार नाही.

एक प्रकारे परिणय फुके यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिला असून आचारसंहिता सुरु असतांना पोलिसांना दम दिल्याचा प्रकार झालेल्या व्हिडिओतून लक्षात येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी दंडात बदल करून वाहतूक व्यवस्था सुरळित करण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांच्याच पक्षाचे मंत्री पोलिसांना दम देत असल्याने वेगवेगऴ्या चर्चांना उधाण आले.

आणखी बातम्या वाचा :
- हार्दिक पटेल काँग्रेसची साथ सोडणार 

- शिवेसनेने राणे कुटुंबाचा पराभव कितीवेळा करावा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Dr. Parinay Fuke Modis rally viral video