मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा; पोलिसाला मारणे पडले महागात 

अतुल मेहेरे
Thursday, 15 October 2020

ॲड. यशोमती ठाकूर यांच्यावरील आरोप न्यायालयात सिद्ध झाले आहेत. विशेष म्हणजे, फितूर होऊन साक्ष देणारा एक पोलिस कर्मचारीसुद्धा यामध्ये शिक्षेसाठी पात्र ठरला आहे.

नागपूर ः महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रौराळे या पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. यामध्ये त्यांचा वाहनचालक आणि सोबतच्या दोन कार्यकर्त्यांनीही हात धुवून घेतले होते. याप्रकरणी अमरावती न्यायालयाने ॲड. ठाकूर यांना तीन महिने शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

क्लिक करा - अख्ख्या गावात पेटली नाही एकही चूल, कारण गावातला प्रत्येकच झाला होता शोकाकूल

ॲड. यशोमती ठाकूर यांच्यावरील आरोप न्यायालयात सिद्ध झाले आहेत. विशेष म्हणजे, फितूर होऊन साक्ष देणारा एक पोलिस कर्मचारीसुद्धा यामध्ये शिक्षेसाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्‍वास अधिक वृद्धिंगत झाल्याचे बोलले जात आहे. 

पोलिसांवर हात उचलण्याचा आरोप सिद्ध झालेल्या मंत्री ठाकूर आता नैतिक जबाबदारी स्विकारुन राजीनामा देतील का, असा प्रश्‍न भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी केला आहे.

ठळक बातमी - मुलाला असलेले मोबाईलचे वेड बेतले वडिलांच्या जीवावर; कुटुंबातील कर्त्या पुरुषाने उचलले टोकाच पाऊल

अमरावती न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे. आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये पोलिस विभागातील कर्मचाऱ्याला न्याय मिळाला आहे. सत्तेची नशा उतरायला थोडा काळ जाऊ द्यावा लागतो. पण चढलेली ही नशा कधी ना कधी उतरतेच, याचे प्रत्यंत्तर न्यायालयाच्या आजच्या निकालावरुन आले आहे, असेही शिवराय कुळकर्णी यांनी सोशल मिडीयावर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Yashomati Thakur gets 3 months punishment by court