हे काय... चार वर्षाच्या मुलाला मातेने सोडले बेवारस, सुदैवाने अनर्थ टळला

The mother left her four-year-old child alone in Yavatmal
The mother left her four-year-old child alone in Yavatmal
Updated on

आर्णी (जि. यवतमाळ)  : आईसाठी तिचे अपत्य तिचा जीव की प्राण असते. आपल्या मुलाच्या सुरक्षेसाठी माता स्वतःचा जीव धोक्यात घालते. आपल्या अपत्यासाठी मातेने दिव्य पार केल्याची अने्क उदाहरणे इतिहासात आहेत. परंतु याच मातेच्या प्रेमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना यवतमाळमध्ये उघडकीस आली. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

शहरात एका विवाहित महिलेने आपल्या चार वर्षाच्या चिमुकल्या बाळाला बेवारस सोडून दिल्याची घटना उघडकीस आली. या बालकाने पोलिसांना वडिलांचा मोबाईल क्रमांक सांगितल्याने पोलिसांनी त्याला सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

अमरावती जिल्ह्यातील तळेगाव ठाकूर येथील एक विवाहित महिला आपल्या चार वर्षाच्या मुलासोबत शुक्रवारी (ता.4) आर्णी येथे आली होती. या ठिकाणी मुलाला बेवारस सोडून ती कुठेतरी निघून गेली. आई दिसत नसल्याने हा बालक शहरात रडत भटकत होता. ही बाब काही जागरूक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या बालकाला पोलिसांच्या स्वाधीन केले. 

चार वर्षीय बालकाने तोंडपाठ असलेला आपल्या वडिलांचा मोबाईल नंबर आर्णी पोलिसांना सांगितला. पोलिसांनी लगेच त्याच्या वडिलांशी संपर्क साधला. वडिलांनी तत्काळ त्यांच्या माहूर येथे पोलिस म्हणून कार्यरत असलेल्या मेहुण्याला आर्णी पोलिस ठाण्यात पाठविले.

मामाने भाच्याचा ताबा घेतला आणि या बालकाला दुसर्‍या दिवशी शनिवारी (ता.5) सुखरूप वडिलांच्या ताब्यात दिले. जागरूक नागरिक आणि आर्णी पोलिसांच्या तत्परतेमुळे हा मुलगा वेळीच वडिलांना मिळू शकला. या मुलाची आई त्याला सोडून कुठे गेली, हे वृत्त लिहिपर्यंत कळू शकले नव्हते. पोलिसांनी या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सांगितले.

संपादन : अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com